शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘बोगस नळ जोडणी’ दोघांचा नाहक बळी

By admin | Updated: February 9, 2017 00:14 IST

निर्देश देणारेच बाजूला : नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

इचलकरंजी : शहरातील जवाहरनगरमध्ये देण्यात आलेल्या बोगस नळ जोडण्यांप्रकरणी दोषी धरून फिटर नामदेव वड्ड व सहायक आनंदा लाखे यांच्यावर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. मात्र, तत्कालीन पाणीपुरवठा सभापती व जलअभियंता यांच्या निर्देशाने नळ जोडण्या देण्यात आल्यामुळे याप्रकरणी या दोन्ही कर्मचाऱ्यांचा नाहक बळी गेल्याची चर्चा नगरपालिकेकडील पाणीपुरवठा विभागाकडे बुधवारी दिवसभर होती.जवाहरनगरमधील कबनूर गावठाणात असलेल्या तीन वसाहतींचा समावेश इचलकरंजी नगरपालिका हद्दीमध्ये झाला. त्यावेळी या हद्दीतील नागरिकांना नळाचा पाणीपुरवठा होण्यासाठी संबंधित परिसरातील नगरसेवकांनी पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ व जलअभियंता ए. एन. जकीनकर यांच्यावर दबाव आणून नळ जोडण्या देण्यास भाग पाडले. तेव्हा प्रथम नळ जोडण्या देऊन त्यानंतर संबंधित कागदपत्रे पूर्ण करून घ्यावयाचे ठरले होते. त्याप्रमाणे ६१२ नळ जोडण्या दिल्या गेल्या.नळ जोडण्या दिल्यानंतर काही दिवसांत नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अवैधरित्या जोडण्यात आलेल्या नळ जोडण्या वैध करण्यासाठी कोणीच स्वारस्य दाखविले नाही. परिणामी, या परिसरातील नळजोडण्या बोगस झाल्या.दरम्यानच्या काळात जलअभियंता जकीनकर यांची बदली होऊन गेली. त्यांच्या जागी आलेले जलअभियंता सुरेश कमळे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी याबाबतचा अहवाल मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडे दिला. त्यावरून डॉ. रसाळ यांनी वड्ड व लाखे या दोन कर्मचाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. वास्तविक पाहता या दोघांनी सभापती व जलअभियंता यांच्या निर्देशानुसार या नळ जोडण्या दिल्या. ही बाब मात्र यामुळे दुर्लक्षित राहिली आहे. परिणामी, या दोघांचा बळी गेल्यामुळे नगरपालिकेत खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)