शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात वाढती रुग्णसंख्या; प्रशासनाची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:25 IST

जयसिंगपूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णसंख्या ३४ वर पोहोचली असून याचा फैलाव ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी ...

जयसिंगपूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णसंख्या ३४ वर पोहोचली असून याचा फैलाव ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर नागरिकांना कोरोना नियमावलींचे पालन करण्याबाबतचे आवाहनही करण्यात येत आहे. तसेच नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिलेल्या आदेशानुसार ४५ वयोगटावरील सर्व नागरिकांना लस देण्याबाबत शहरासह ग्रामीण भागात कार्यवाही सुरू करण्यात आली. सध्या जयसिंगपूर शहरात सर्वाधिक रुग्ण असून ग्रामीण भागात याचा फैलाव होवू नये, यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी नागरिकांचाही प्रतिसाद तितकाच महत्त्वाचा असणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही दिसून येते. तरुण वर्ग मास्कचा वापर करत नसल्याचे चित्र आहे. भाजी व फळे विक्रेत्यांच्या अ‍ॅन्टिजेन तपासणीचा विषयही मागे पडला आहे. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर पोलीस व पालिका प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याची गरज आहे.