शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ऑक्सिजनसह रेमडेसिविरचा वाढीव पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:24 IST

कोल्हापूर : जिल्ह्यासाठी आज शुक्रवारपासून १५ टन ऑक्‍सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा चार पट वाढीव पुरवठा सुरू झाल्याची माहिती ...

कोल्हापूर : जिल्ह्यासाठी आज शुक्रवारपासून १५ टन ऑक्‍सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा चार पट वाढीव पुरवठा सुरू झाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असून, पुढील आठवड्यापर्यंत सगळं सुरळीत होईल, असंही ते म्हणाले.

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीच्या उपाययोजना, ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा वाढवण्यासाठी मी स्वत: व पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुंबईत पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून आज जवळपास तिप्पट -चौपट इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत. यापूर्वी जिल्ह्याला रोज ३० टन ऑक्सिजन पुरवठा होत होता तो आता १५ टनाने वाढून ४५ टन इतका होणार आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत झाला असून, आजच अडीच हजारावर इंजेक्शन मिळाले आहेत. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी बेड उपलब्ध आहेत. कोल्हापूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून, आठवड्याभरात हे सर्व आटोक्यात येईल. जिल्ह्यात मृत्यूदर जास्त असला तरी आपण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. ही परिस्थिती फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर आता वाढलेलाच आहे.

मुंबईत कोरोना परिस्थितीत सुधारणा करत ऑक्सिजनचे मॅनेजमेंट केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारचा गौरव केला आहे. दुसऱ्या लाटेशी यशस्वी संघर्ष केल्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. परवा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील आपल्या महाराष्ट्र राज्याचे कौतुक केले आहे. हे सर्व एका बाजूला होत असताना, भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी आमदार अमल महाडिक दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत.

---