शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बगॅसचे मूल्य वाढवून २८ टक्के करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 20:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखर कारखान्यांमधून निर्माण होणाºया बगॅसचे मूल्य हे वीज प्रकल्प आहेत तिथे चार टक्के व ज्या कारखान्यात वीज प्रकल्प नाहीत, त्यांनी मूल्यच धरू नये, अशी अधिसूचना भाजप सरकारने काढली आहे. बुधवारी (दि. १३) होणाºया ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीत हे मूल्य वाढवून २८ टक्के करावे, या मागणीसाठी अंकुश ...

ठळक मुद्देअंकुश, बळिराजा, शेतकरी संघटनेची मागणी : सोमवारी पुण्यात आमरण उपोषणमंडळातील शेतकरी प्रतिनिधींनी या बगॅसच्या चुकीच्या तरतुदीविषयी एकदाही शासनाला जाब विचारलेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखर कारखान्यांमधून निर्माण होणाºया बगॅसचे मूल्य हे वीज प्रकल्प आहेत तिथे चार टक्के व ज्या कारखान्यात वीज प्रकल्प नाहीत, त्यांनी मूल्यच धरू नये, अशी अधिसूचना भाजप सरकारने काढली आहे. बुधवारी (दि. १३) होणाºया ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीत हे मूल्य वाढवून २८ टक्के करावे, या मागणीसाठी अंकुश सामाजिक संस्था, शेतकरी संघटना, बळिराजा संघटना यांच्या वतीने सोमवार (दि. ११) पासून पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन व आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, अशी माहिती पी. जी. पाटील-वाकरेकर व धनाजी चुडमुंगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील-वाकरेकर व चुडमुंगे म्हणाले, सी. रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार राज्य शासनाने २०१३ मध्ये ऊस नियंत्रण कायदा केला आहे. यामध्ये उसाचा अंतिम दर ठरविण्यासाठी ऊस नियंत्रण मंडळ स्थापन केले असून, यामध्ये कारखान्यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी तसेच अध्यक्ष म्हणून राज्याचे मुख्य सचिव व मंडळाचे सचिव म्हणून साखर आयुक्त आहेत. भाजप सरकारने यामध्ये सुधारणा करून १६ फेब्रुवारी २०१६ ला पुन्हा अधिसूचना काढली. त्यानुसार उसाचा दर निश्चित करण्याचे मापदंड दिले आहेत. त्यामध्ये उसापासून एकूण तयार होणारी साखर, मळी, बगॅस व प्रेसमड यांचे बाजारभावानुसार उत्पन्न काढायचे; त्यातून तोडणी, वाहतूक खर्च वजा करून उर्वरित रकमेतील ७० टक्के शेतकºयांना व ३० टक्के कारखानदारांना द्यायचे, असे सूत्र ठरविण्यात आले आहे.

हे सर्व बरोबर असले तरी या अधिसूचनेमध्ये बगॅसचे मूल्य हे निर्माण होणाºया संपूर्ण बगॅसचे न धरता ज्यांचे वीज प्रकल्प आहेत, त्यांनी चार टक्के बगॅसचे मूल्य धरायचे व ज्या कारखान्यांचे वीज प्रकल्प नाहीत, त्यांनी बगॅसचे मूल्यच धरू नये, असा उपनियम केला आहे. त्यामुळे शेतकºयांचे टनाला ५०० ते ६०० रुपये नुकसान होऊन कारखान्यांचा फायदा होणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही अधिसूचनेतील चूक दुरुस्त करा म्हणून आम्ही सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. उसाच्या अंतिम दरात उत्पादकांना टनाला ५०० ते ६०० रुपये तोटा होणार आहे. हे कळत असूनही नियंत्रण मंडळातील शेतकरी प्रतिनिधींनी या बगॅसच्या चुकीच्या तरतुदीविषयी एकदाही शासनाला जाब विचारलेला नाही; त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.यावेळी नितीन पाटील, अविनाश पाटील, प्रभाकर बंडगर, सत्यजित सोमण, दत्ता मोरे, आदी उपस्थित होते.