लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : नवीन सभासद वाढीसाठी असोसिएशनच्या कार्याची व्याप्ती वाढवावी, असे मत कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष मणिलाल कांगटाणी यांनी व्यक्त केले. संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
कांगटाणी म्हणाले,नवीन सभासद वाढीसाठी असोसिएशनच्या कार्याची व्याप्ती फक्त शेअर बाजारांपुरती मर्यादित न ठेवता सर्वच क्षेत्रांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. गुंतवणूकदारांमध्ये जागरूकतेची आवश्यकता आहे. याबाबत गुंतवणूकदारांचे हितरक्षणसाठी त्यांना शेअर बाजाराची माहिती व प्रशिक्षण देणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन गेणे, आदींचे आयोजन केले जाईल. अहवाल वाचन सचिव श्रीनिवास पंडित यांनी केले. यावेळी सहसचिव संदीप अथणे, खजानिस प्रवीण ओसवाल, सहखजानिस सुरेश पटेल, संचालक अजित गुंदेशा, राजीव शहा, विपीन दावडा, रवींद्र सबनीस, अशोक पोतनीस आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : २११२२०२०-कोल-इन्व्हेस्टर्स असोसिएशन
आेळी : कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन अध्यक्ष मणीलाल कांगटाणी यांनी दीपप्रज्वलनाने केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.