शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दुभत्या जनावरांच्या किमतीत भरमसाठ वाढ

By admin | Updated: June 8, 2015 00:54 IST

शेतकरी चिंतेत : दुधाला मिळेना उत्पादन खर्चावर आधारित भाव

संजय पाटील -देवाळे -ग्रामीण भागात शेती व्यवसायाबरोबरच विविध शेतीपूरक व्यवसाय केले जातात. शेतीला संलग्न असलेला दूध व्यवसाय मात्र आता मोठ्या अडचणीत येताना दिसत आहे. एका बाजूला दुभत्या जनावरांच्या किमतीत होणारी भरमसाठ वाढ व त्या प्रमाणात दुधाला न मिळणारा भाव, यामुळे खर्चाच्या तुलनेत नफा अगदी अल्प असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.दूधपंढरी म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. अस्सल व जातिवंत जनावरे पाळण्याचा व त्यांचे संगोपन करण्यासाठी येथील शेतकरी प्रसिद्ध आहे. मात्र, दुभत्या जनावरांसाठी लागणारे पशुखाद्याचे वाढलेले दर, वाळल्या चाऱ्याला आलेला सोन्याचा भाव व त्या प्रमाणात दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे.करवीर तालुक्यातील कोपार्डे, तर हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावचा म्हैस, गाय व बैल बाजार पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. मात्र, गत बाजार अत्यंत कडक होता. दुभत्या जनावरांच्या वाढलेल्या किमतीमुळे खरेदी-विक्रीवर त्याचा परिणाम झाल्याचे व्यापारी समितीकडून सांगण्यात आले. दूध संस्था, पतसंस्थांकडून कर्जे काढून दुभती जनावरे खरेदी करून त्याचे व्याज व परतफेड करणे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून परवडत नाही. त्याचा परिपाक जनावरे पाळण्याच्या संख्येत घट होत आहे.सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आठवडा बाजारातून सामान्य शेतकऱ्यांना जातिवंत जनावरे मिळतील याची खात्री नाही. बऱ्याचदा व्यापारी व दलालांकडून गाय, म्हैस, बैल खरेदीत फसवणुकीचे प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. दुभत्या जनावरांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पशुखाद्याच्या दरात झालेली वाढ, दूध संस्थांमधील फॅट दरात होणारा सावळा-गोंधळ, दूध संस्थांतील गैरव्यवहार या साऱ्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.दराअभावी दूध उत्पादनात घट दुभत्या जनावरांच्या वाढत जाणाऱ्या किमतीमुळे व पतपेढ्यांमधील आर्थिक उचलीमुळे शेतकरी जनावरे कमी करीत आहेत. त्यातच दुधाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नाही. जनावरांच्या संख्येत घट झाल्यामुळे दूध उत्पादन घटू लागले आहे, असे जयनंदा पाटील यांनी सांगितले.म्हशींच्या दरात वाढम्हशींच्या खरेदी दरात सुमारे ४५ ते ५५ हजारांपर्यंत वाढ झाली. दुभत्या जनावरांमध्ये पंढरपुरी म्हैस (५५ ते ७५ हजार), मुऱ्हा म्हैस (४० ते ५० हजार), गवळाट म्हैस (३० ते ४० हजार), तर जर्सी गाय (२५ ते ४० हजार) असे भाव वाढले आहेत.