शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन निर्मिती, साठवणूक क्षमता वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता वाढवा, रिफिलिंगची ठिकाणे वाढवा, ...

कोल्हापूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता वाढवा, रिफिलिंगची ठिकाणे वाढवा, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची कामे तत्काळ पूर्ण करा. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या बेडची संख्या वाढवा अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित काेरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. उषा कुंभार तसेच संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, शहर व ग्रामीण भागांतील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये विद्युत पुरवठा व विद्युत मशिनरी सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पूर्ण क्षमतेचे जनरेटर बसवावेत. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करा. येथील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी तेथील वैद्यकीय सेवा सुविधा वाढवा, स्राव तपासणीचे अहवाल वेळेत मिळण्यासाठी शासकीय प्रयोगशाळेमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्या होणे गरजेचे आहे, यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात वैद्यकीय सेवा-सुविधा गतीने निर्माण होण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय मान्यता तत्काळ घेऊन कामे गतीने मार्गी लावावीत.

सद्य:स्थितीत असणारे आयसीयू बेड, उपलब्ध व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लॅन्ट, जनरेटर सुविधा, ऑनलाईन माहिती भरण्याची वेळेत कार्यवाही करणे, स्राव तपासणी क्षमता, बिलांचे ऑडिट, मृत्यू ऑडिटवर अधिक लक्ष देणे, रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी उपाययोजना, रुग्णवाहिका, लसीकरण आदी विषयांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. उपस्थित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांशी संबंधित कामाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली.

---

जादा बिल आकारल्यास रुग्णालयांवर कारवाई

रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांचे ऑडिट करणाऱ्या पथकांनी बिलांची काटेकोर तपासणी करून रोजच्या रोज अहवाल सादर करावा. जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. बिलांचे ऑडिट आणि डेथ ऑडिटवर अधिक लक्ष देण्यात येणार असून रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

---

फाेटो नं १९०७२०२१-कोल-कोरोना बैठक

ओळ : कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी कोरोना आढावा बैठक घेतली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अपप्र जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.

----