शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

नगराध्यक्षांच्या बंडाच्या व्याप्तीत वाढ

By admin | Updated: January 7, 2015 23:51 IST

इचलकरंजीचे राजकारण : दोन्ही काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींमध्ये अस्वस्थता; कॉँग्रेसचे नऊ, राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक ‘शविआ’च्या संपर्कात

इचलकरंजी : येथील नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या बंडाची व्याप्ती वाढू लागली असून, कॉँग्रेसमधील नऊ नगरसेवक व राष्ट्रवादीतील दोन नगरसेवक फुटीरतेच्या उंबरठ्यावर असल्याने दोन्ही कॉँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. दरम्यान, शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नगराध्यक्षा बिरंजे, ‘शविआ’चे सर्व प्रमुख व दोन्ही कॉँग्रेसचे मोजकेच नगरसेवक उपस्थित राहिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.नगराध्यक्षा बिरंजे यांनी सोमवारी (दि. ५) राजीनामा देण्यास ठाम नकार दिला. त्यावेळी शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक व कारंडे गटाचे चार नगरसेवक यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे शहर कॉँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. त्यापाठोपाठ येथील जय सांगली नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये आमदार हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली शहर विकास आघाडीची बैठक झाली. बैठकीस सागर चाळके, बादशहा बागवान, अजित जाधव, जयवंतराव लायकर, अशोक स्वामी, तानाजी पोवार, महादेव गौड, सुनील महाजन, राष्ट्रवादीचे विठ्ठल चोपडे, नगराध्यक्षा बिरंजे, त्यांचे पती श्रीकांत बिरंजे, पांडुरंग बिरंजे, कॉँग्रेसचे नगरसेवक संजय तेलनाडे, चंद्रकांत शेळके, आदी उपस्थित होते.काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा, आयजीएम हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालू करणे, यासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळवून विकासकामे करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त केला. नगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने विविध प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा इच्छा असूनही देता येत नाहीत. याबाबतही सविस्तर चर्चा झाली. त्याचबरोबर नगराध्यक्षा बिरंजे यांच्या बंडामुळे नगरपालिका कामकाजावर होणाऱ्या परिणामांचा ऊहापोह करण्यात आला. (प्रतिनिधी)चुकीच्या सल्ल्याबद्दल पक्षश्रेष्ठींकडून खरडपट्टीनगराध्यक्षांच्या बंडाबाबत नेमकी माहिती नसल्यामुळे पालिकेतील एका प्रमुखाने दिलेला सल्ला चुकीचा ठरला. उलट त्यामुळे नगराध्यक्षांच्या बंडाची व्याप्ती वाढली. पालिकेतील त्या प्रमुखाची कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी खरडपट्टी काढली. पक्षप्रमुख असूनही त्याचा नगरसेवकांशी ‘प्रॉपर’ संपर्क नाही. नगरसेवकांची नस माहीत नसल्याने दैनंदिन कामकाजातसुद्धा गोंधळ उडत असल्याने पक्षश्रेष्ठी त्याच्यावर भडकले होते.नगराध्यक्षांच्या कार्यालयाचा ‘शविआ’कडून ताबानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष कार्यालयात सातत्याने बसणाऱ्या शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांची आज, बुधवारी नगराध्यक्षांच्या कार्यालयामध्ये वर्दळ वाढली होती. सागर चाळके, सुनील महाजन यांच्यासारखे ‘शविआ’तील प्रमुख मंडळींनी नगराध्यक्षांच्या अ‍ॅँटी चेंबरमध्ये ठाण मांडले होते. ‘शविआ’च्या नगरसेवकांचा राबता पाहता कॉँग्रेसचेच नगरसेवक नगराध्यक्षांच्या कार्यालयाकडे फिरकले नाहीत.