शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्यावर दोन महिन्यांत लेनची संख्या वाढवा

By admin | Updated: April 8, 2015 00:32 IST

आनेवाडी : व्यवस्थापनाला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश

सातारा : आनेवाडी येथील टोल नाक्यावर होणारी कोंडी लक्षात घेऊन दोन महिन्यांत दोन स्वतंत्र शुल्क संकलन केंद्रे येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावर वेगवेगळ्या स्वरूपात उभारावीत आणि प्रत्येक ठिकाणी लेनची संख्या ८ ते १० असावी, असा आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आनेवाडी टोल नाका व्यवस्थापनाला दिला आहे. पी. एस. टोल प्रा. लि. या कंपनीला आनेवाडी टोल नाक्यावर शुल्कसंकलनाचा ठेका देण्यात आला आहे. तेथे होणाऱ्या अनुचित प्रकारांबद्दल जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १३३ (अ) अन्वये कारवाई करून अहवाल मागविला होता. खुलासा सादर करण्यासाठी कंपनीला ३० मार्चची मुदत देण्यात आली होती. त्या दिवशी टोल व्यवस्थापक विवेक शर्मा यांनी खुलासा सादर केला होता. करारनामा, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, गैरवर्तणूक करणाऱ्यांवरील कारवाई, २० किलोमीटर परिघातील वाहनांना सवलतीचे पास, लेनची सध्याची संख्या, फेरीवाल्यांचा वावर आदी विषयांवर कंपनीने सादर केलेल्या खुलाशानंतर हे आदेश देण्यात आले.आनेवाडी नाक्याबाबत सातत्याने तक्रारी होत असून, वाहनांच्या लांब रांगा लागतात. त्यामुळे लेनची संख्या वाढविणे आणि रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र लेन ठेवणे आवश्यक आहे, असे उपविभागीय दंडाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी आदेशात म्हटले आहे. रुग्णवाहिकांबरोबरच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांसाठीही स्वतंत्र लेन तयार करण्यास सांगण्यात आले असून, लेनमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाहने रांगेत असतील तर त्या ठिकाणी जादा कर्मचारी नेमून तातडीने लेनमधील वाहतूक सुरळीत करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)असे आहेत अन्य आदेशशुल्कसंग्रह करण्यासाठी प्रशिक्षित आणि नम्र कर्मचारी नेमावेत.कर्मचारी आणि वाहनचालकांत तंटा होऊ देऊ नये.शुल्क संकलनाच्या ठिकाणी कंपनीचा जबाबदार अधिकारी कायमस्वरूपी असावा.टोल नाक्यावरील फिरत्या विक्रेत्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.तक्रार पेटी व तक्रार नोदविण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याचा दूरध्वनी क्रमांक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्यात यावा.