शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नद्यांच्या पातळीत वाढ

By admin | Updated: October 5, 2015 01:02 IST

शिवारात पाणीच पाणी : चार दिवसांत जिल्ह्यात ४१३ मिलिमीटर पाऊस

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांत जिल्ह्णात ४१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दररोज पाऊस सुरू असल्याने खरीप काढणी खोळंबली असून, शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून, गेल्या चार दिवसांत पंचगंगेच्या पातळीत चार फुटांनी वाढ झाली आहे. मान्सूनने पाठ फिरवल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने थोडा दिलासा दिला आहे. खरीप पिके काढणीला आली आहेत. या पावसाने पिकांचे नुकसान होणार हे निश्चित असले तरी ऐन पावसाळ्यात जमिनीला पाझरच फुटला नसल्याने यंदा डिसेंबरनंतरच पाणीटंचाई भासणार आहे. त्यामुळे हा पाऊस पाणीटंचाई कमी करण्यासाठी पोषकच मानला जात आहे. गेले चार दिवस जिल्ह्णात दररोज पाऊस सुरू आहे. दुपारी एक-दीडनंतरच पावसाला सुरुवात होत आहे. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी एक वाजता कोल्हापूर शहराला तब्बल तासभर जोरदार पावसाने झोडपले. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्णाला झोडपून काढले. परीख पुलाखाली बघताबघता दोन-अडीच फूट पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळीत झाली. गेल्या चार दिवसांत जिल्ह्णात ४१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस भुदरगड तालुक्यात ६८ मिलिमीटर झाला आहे. पाऊस सुरूच असल्याने नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पातळी चार फुटांनी वाढली आहे. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू आहे. कागल परिसरात पाऊसकागल : कागल शहर आणि परिसरास शनिवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. दुपारी दीडच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह हा पाऊस सुरू झाला. तासभर कोसळल्यानंतरपावसाचा जोर कमी आला. मात्र, उशिरापर्यंत रीमझीम सुरू राहिली. दिवसभर हवामान कोंदट आणि ढगाळ राहिले. कोडोलीत पाऊसकोडोली : कोडोली व परिसरात रविवारी जोरदार पाऊस झाला. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. सध्या परिसरात सोयाबीन, हायब्रीड व भुईमूग पिकांची काढणी चालू आहे. या पावसामुळे सध्या सुरू असलेल्या हायब्रीड, भुईमूग व सोयाबीनची सुगी चाललेल्या शेतकऱ्यांची मात्र धांदल उडाली.रविवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस मि.मी.मध्ये असा -हातकणंगले -३.१२, शिरोळ -२.१४, पन्हाळा - ७, शाहूवाडी - २.५०, राधानगरी - १.८३, गगनबावडा - ७, करवीर - ५.४४, कागल - १५.७०, गडहिंग्लज - ४.७१, भुदरगड - निरंक, आजरा - १.५०, चंदगड - ०.३३लक्ष्मीपुरी आठवडीबाजार पाण्यातलक्ष्मीपुरी येथील आठवडी बाजारालाही पावसाचा तडाखा बसला. मुळात बाजार परिसरातील गटारी लहान असल्याने सांडपाणी थेट रस्त्यांवरच येते. त्यात पाऊस जोेरात झाल्याने सर्व बाजारच पाण्यात गेल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांची तारांबळ उडाली.