शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न वाढीसाठी मिळकतींचे फेरसर्वेक्षण

By admin | Updated: March 9, 2016 00:36 IST

सोमवारपासून प्रारंभ : महापालिकेचा खासगी कंपनीस ठेका, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाकडून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शहरातील सर्व मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्याचे काम सोमवार (दि. १४) पासून हाती घेतले जाणार आहे. हे काम खासगी ठेकेदारावर सोपविण्यात आले असून, पुढील सहा महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण करून त्याची माहिती महानगरपालिकेला द्यायची आहे. त्यामुळे सध्या ज्या मिळकतींना घरफाळा लागू झालेला नाही, तो लागू होईल आणि पर्यायाने पालिकेचे उत्पन्न वाढेल, असा प्रशासनाचा दावा आहे. कोल्हापूर महानगरपालिका सध्या शहरवासीयांवर सन २०११-२०१२ सालच्या रेडीरेकनरवर आधारित घरफाळ्याची आकारणी करीत आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून २०१५-२०१६ सालच्या रेडीरेकनरवर घरफाळा आकारण्याचा प्रस्ताव होता ; परंतु त्याला महासभेने मंजुरी न देता प्रचलित दरानेच घरफाळा आकारणी करावी, असा आदेश प्रशासनास दिला आहे. त्यामुळे घरफाळ्याचे उत्पन्न वाढण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच महापालिका प्रशासनाने सध्या घरफाळा भरत नसलेल्या इमारती तसेच अतिरिक्त बांधकाम झालेल्या मिळकती शोधून काढून त्यांच्यावर नव्याने घरफाळा आकारणी करण्यासाठी शहरातील सर्वच मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सायबर टेक’ नावाच्या खाजगी कंपनीला सर्व्हेक्षण करण्याचे काम देण्यात आले आहे. या कंपनीचे ६० कर्मचारी पुढील सहा महिन्यांत शहरात सर्वत्र घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहे. घराची, फ्लॅटची मोजमापे घेणार आहेत. तसेच मिळकतीचा वापर वाणिज्य आहे की निवासी आहे, याचीही ते माहिती घेतील. त्यानंतर संबंधित मिळकतधारकाचे परिपूर्ण माहितीपत्रक तयार करून कंपनीचे कर्मचारी महापालिकेस ते सादर करतील. त्यानंतर पालिकेचा सध्याची माहिती तपासून ज्यांच्यावर घरफाळा लागूच झालेला नाही किंवा ज्यांचे बांधकाम अतिरिक्त झालेले आहे, त्यांच्यावर योग्य घरफाळा लावला जाईल. तत्पूर्वी मिळकतधारकांना हरकतीची संधी देण्यात येणार आहे. फेरसर्वेक्षण झाल्यावर घरफाळा लागलाच नाही अशा मिळकती सापडतील आणि त्यामुळे घरफाळ्याचे उत्पन्न वाढेल, असा दावा आयुक्त पी. शिवशंकर यांनी केला.(प्रतिनिधी)स्पॉट बिलिंगचा प्रयोग यशस्वीशहरातील नळजोडणीधारकांना स्पॉट बिलिंगद्वारे बिले देण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. सध्या सी व डी वॉर्डांतील काम सुरूआहे. मीटर रीडरना बिलिंग करण्यास थोडा विलंब होत आहे; परंतु त्यात गती आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एप्रिलपासून ए व बी वॉर्डांतील नळजोडणीधारकांनाही अशी बिले देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दंडव्याजात सवलत नाहीघरफाळा थकबाकीसाठी आकारण्यात येत असलेल्या दंडव्याजात पंचाहत्तर टक्के सवलत देण्यात यावी, असा स्थायी समितीत ठराव झाला आहे; परंतु गेल्याच वर्षी पन्नास टक्के सवलत देण्यात आल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी अशी सवलत देता येत नाही. त्याला कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळे जरी ठराव झाला असला तरी तशी सवलत यंदा मिळणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. मिळकतींवर बोजा चढविणारशहरातील पंधरा लाख रुपयांच्या वर थकबाकी आहे, अशा ६० जणांना यापूर्वी नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांची सुनावणीही झाली आहे. त्यांना थकबाकी भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.