कोल्हापूर : शहरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या. वाहन चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेसमोर चोरट्यांनी आव्हान निर्माण केले आहे.
गेल्या चार महिन्यांत शहरातून मोठ्या प्रमाणात वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. पण त्याप्रमाणात पोलिसांना चोरटे गुंगारा देत असल्याची स्थिती आहे. शुक्रवारी शनिवार पेठेतील सीटी सर्व्हे कार्यालयासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. जयवंत शिवाजीराव मगदूम (६१, रा. शाहूनगर, राजारामपुरी) यांनी याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच सानेगुरुजी वसाहतमधील विठ्ठल पार्क अपार्टमेंटमधील राहणारे विहारी हणमंत सरदार यांनी सोमवारी रात्री आपली दुचाकी इमारतीमधील पार्किंगमध्ये उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
(तानाजी)