गडहिंग्लज : येथील ओंकार शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णा-भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांच्याहस्ते भित्तीपत्रकाचे उद्घाटन झाले. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी अण्णा-भाऊ साठे यांच्याविषयी माहिती दिली. यावेळी भीमराव शिंदे, सुरेश धुरे, डॉ. शर्मिला घाटगे, प्रकाश कांबळे, अभिषेक तपकिरे आदी उपस्थित होते.
-------------------------
२) अर्णव बुवा जिल्ह्यात प्रथम
गडहिंग्लज : शहरातील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलचा विद्यार्थी अर्णव मच्छिंद्र बुवा याने जिल्हास्तरीय कला उत्सवांतर्गत ऑनलाईन शास्त्रीय गायनमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कला उत्सवासाठी निवड झाली आहे. त्याला मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण, संगीतशिक्षक एस. व्ही. चोथे यांचे प्रोत्साहन मिळाले, तर प्राचार्य मच्छिंद्र बुवा यांचे मार्गदर्शन लाभले.