वारणा दूध संघाच्या कर्मचारी सभासदांसाठी अमृत सेवक पतसंस्था कार्यरत आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल ४० कोटींच्या वर असून संस्थेकडे ५ कोटी ३६ लाखांच्या ठेवी आहेत. संस्थेचे दीड हजारावर सभासद असून, वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था यशस्वीपणे वाटचाल करीत आहे, असे संस्थेचे अध्यक्ष मोहन येडूरकर यांनी सांगितले. अमृत बझारच्या माध्यमातून सेवक कर्मचारी, इतर ग्राहकांना सेवा दिली जात असल्याचेही येडूरकर यांनी सांगितले.
यावेळी दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, संघाचे सर्व संचालक, अकाउंटसचे सुधीर कामेरीकर, सेवक संस्थेचे उपाध्यक्ष के.एम.वाले,इनचार्ज सचिव उदय निकम, संचालक मधुकर इंगळे, बाजीराव साळोखे, राजाराम मांगलेकर, दीपक पाटील, बाळासो उबाळे, प्रकाश पाटील, पांडुरंग नरुटे, अस्लम आंबी, रवींद्र गायकवाड, सर्जेराव बागडी, शीतल बसरे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सचिव उदय निकम यांनी आभार मानले.
फोटो ओळी : वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावरील अमृत सेवक पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन येडूरकर, दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, संचालक ॲड. एन. आर. पाटील, अभिजीत पाटील, शिवाजी कापरे, व्ही.टी.पाटील, शिवाजी जंगम, चंद्रशेखर बुवा, मधुकर इंगळे आदी.
(राहुल फोटो - कोडोली)