यावेळी शेट्टी म्हणाले, शिरोली हे कबड्डीत खेळाडू तयार करणारे जिल्ह्यातील मोठे गाव आहे. या ठिकाणचे खेळाडू देशपातळीवर चमकले असून अनेकांना या कबड्डीमुळे नोकरी मिळाली आहे. माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या निधीतून दिलेल्या कबड्डी मॅटचे उद्घाटन मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आलेे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष उदय पाटील, प्राध्यापक संभाजी पाटील, रमेश मेंडीगिरी, अण्णासाहेब गावडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, माजी उपसरपंच राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, दीपक यादव, बाबूराव गावडे, नामदेव गावडे, सुनील गावडे, यशवंत पुजारी, कृष्णात पोवार, उत्तम घाडगे, धोंडीराम पुजारी, रमजान देसाई, रघुनाथ गावडे उपस्थित होते.
फोटो : १० शिरोली कबड्डी
ओळी : शिरोली येथील छावा क्रीडा मंडळाच्या हाॅलचे उद्घाटन करताना माजी खासदार राजू शेट्टी, सुजित मिणचेकर, महेश चव्हाण, उदय पाटील, प्रकाश कौंदाडे, आदी उपस्थित होते.