(फोटो)
इचलकरंजी : येथील श्री काळभैरव नागरी सहकारी पतसंस्थेचे श्री बालाजी पतसंस्थेत विलीनीकरण व सातव्या शाखेचा उद्घाटन समारंभ सोहळा उत्साहात झाला. माजी आमदार राजीव आवळे यांनी फीत कापून उद्घाटन केले.
संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे म्हणाले, सन १९९२ मध्ये ५०० सभासद व एक लाख भागभांडलावर बालाजी पतसंस्थेची सुरुवात झाली. आज संस्थेच्या सर्व शाखा स्व:मालकीच्या आहेत. सर्व शाखा संगणकीकृत असून, कोअर बॅँकिंग प्रणालीद्वारे आधुनिक बॅँकिंग, एसएमएस सुविधा देत आहे. गणेशनगर, विकासनगर, जवाहरनगर या आर्थिकदृष्ट्या मागास भागात संस्थेची शाखा सुरू करून भागातील नागरिकांना दिलासा दिला आहे.
काळभैरवचे अध्यक्ष शशिकांत राक्षे म्हणाले, कोणत्याही संस्थेत आमची संस्था विलीन होण्यापेक्षा बालाजी पतसंस्थेत विलीनीकरण झाल्याचे समाधान झाले आहे. मुख्य लिपिक, उपनिबंधक कार्यालय व काळभैरवच्या सर्व संचालकांच्या हस्ते पतसंस्था विलीनीकरणाचा हस्तांतर आदेश बालाजी पतसंस्थेच्या संचालकांकडे प्रदान केला.
विजय बाबर यांनी स्वागत व उपाध्यक्ष विनायक जोशी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास बाबूराव सावंत, पांडुरंग धोंडपुडे, नगरसेवक किसन शिंदे यांच्यासह सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.
(फोटो ओळी)
०३१२२०२०-आयसीएच-०१
विलीनीकरणानंतर सुरू झालेल्या नव्या शाखेचा फीत कापून माजी आमदार राजीव आवळे यांनी प्रारंभ केला. यावेळी शशिकांत राक्षे, मदन कारंडे, आदी उपस्थित होते.