शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांविरोधात तक्रार देण्यास अमोलची असमर्थता

By admin | Updated: March 27, 2016 00:58 IST

सेंट्रिंग कामगार खून प्रकरण : कारवाईचा चेंडू जिल्हा उपनिबंधकांच्या कोर्टात

कोल्हापूर : दहा ते तीस टक्के व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या खासगी सावकारांविरोधात तक्रार देण्यास बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याने असमर्थता दर्शविली आहे. पोलिसांनी त्याला ‘सावकारांविरोधात तक्रार दे,’ अशी सूचना करताच त्याने ‘विचार करून सांगतो’ असे सांगितले. त्यामुळे सावकारांविरोधातील कारवाईचा चेंडू पोलिसांनी आता जिल्हा उपनिबंधकांच्या कोर्टात टाकला आहे. आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक कारसह जळालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उकलून कटाचा सूत्रधार असलेला अमोल व त्याचा भाऊ विनायक पवार या दोघांना अटक केली. पवार बंधूंनी खासगी सावकारांची नावे रेकॉर्डवर आणल्याने सावकारांच्या पायांखालील वाळू सरकली. पोलिसांनी संशयित खासगी सावकार प्रकाश रमेश टोणपे, सतीश गणपतराव सूर्यवंशी, दत्ता नारायण बामणे, रमेश लिंबाजी टोणपे, स्वरूप किरण मांगले, अशोक बाबूराव तनवाणी, प्रफु ल्ल अण्णासो शिराळे, सूरज हणमंत साखरे, नीलेश जयसिंगराव जाधव, पांडुरंग अण्णासो पाटील, रणजित अशोक चव्हाण, बिपीन ओमकारलाल परमार, अण्णा खोत, जयसिंगराव जाधव, प्रशांत सावंत, आदी सावकारांकडे चार दिवसांपासून चौकशी सुरू केली आहे. सकाळी दहा वाजता हे सावकार पोलिस मुख्यालयात येतात, ते रात्री अकरापर्यंत याठिकाणी थांबून असतात. या सावकारांना तिष्ठत ठेवून त्यांचा रुबाब उतरविण्याची शक्कल पोलिसांनी आखली आहे. पवार बंधूंच्या कोठडीमध्ये पोलिसांनी अमोल पवार याला सावकारांच्या विरोधात तक्रार दे, अशी सूचना केली. त्यावर त्याने ‘आपली मानसिक स्थिती बिघडली आहे. तक्रार द्यायची की नाही, याबाबत विचार करून सांगतो,’ असे उत्तर दिले. तक्रार न दिल्याने पोलिसांनी सावकारांविरोधात पुरावे गोळा करून त्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्याची तयारी केली आहे. पवार याने तक्रार दिल्यास पोलिस थेट सावकारांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करतील. झोप उडाली! अमोल पवार याने पोलिसांना नावे सांगितल्याने सावकारांची झोपच उडाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सावकारांबरोबर त्यांच्या कुटुंबीयांचेही मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावून पोलिसांनी चार दिवस तिष्ठत ठेवले आहे. चौकशीसाठी पोलिस मुख्यालयाच्या पायऱ्या झिजवून सावकार हतबल झाले आहेत. चौकशीतून मुक्त कधी होतो, याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)