शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित ... आजची जोतिबा यात्रा रद्द , पालखी सोहळ्यासह धार्मिक विधी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि जिल्ह्यात पुकारण्यात आलेली संचारबंदी या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आज, सोमवारी ...

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि जिल्ह्यात पुकारण्यात आलेली संचारबंदी या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आज, सोमवारी होणारी श्री जोतिबाची चैत्र यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ज्या २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रेतील धार्मिक विधी व मुख्य पालखी सोहळा साजरा केला जाणार होता. त्यातील पाच मानकरी कोरोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आता हा सोहळा १६ मानकऱ्यांसह देवस्थान समितीचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी अशा ४५ जणांच्या उपस्थितीत होणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त होणारा मुख्य पालखी सोहळा व धार्मिक विधी केवळ २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत घेण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी मंदिर परिसरात उपस्थित राहणाऱ्या २१ मानकऱ्यांसह देवस्थान समितीचे कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांची अँटिजेनसह आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात पाच मानकऱ्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा प्रशासक जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केवळ १६ मानकऱ्यांसह एकूण ४५ जणांच्या उपस्थितीत हा सोहळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच यात्रा रद्द करण्याचा निर्णय समितीने घेतला होता.

सलग दुसऱ्या वर्षी ही यात्रा रद्द होत आहे. या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगराकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत. याशिवाय एक पोलीस अधीक्षक, चार पोलीस निरीक्षकांसह ३०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटाही शनिवारी मध्यरात्रीपासूनच तैनात करण्यात आला आहे. स्वत: पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्यासोबत रविवारी जोतिबा डोंगरावरील बंदोबस्ताची पाहणी केली. डोंगराकडे येणारे तिन्ही रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. हा बंदोबस्त उद्या, मंगळवारी रात्रीपर्यंत असणार आहे. ग्रामस्थांनी जोतिबा डोंगरावर येऊ नये. अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी केले आहे.

बंदोबस्त असा

पोलीस अधीक्षक (१), पोलीस उपअधीक्षक (१), पोलीस निरीक्षक (४), पोलीस कर्मचारी (८०), स्ट्रायकिंग फोर्स (१०), गृहरक्षक दलाचे जवान (१२०) यांचा समावेश आहे.

चौकट

देवस्थानतर्फे लाईव्ह दर्शनाची सोय

संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो भक्तांचे श्री जोतिबा हे श्रद्धास्थान आहे. त्यात संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी भक्तांना जोतिबाची भेट घेता येणार नाही. त्यामुळे हजारो भक्त दर्शनाची आस लावून बसले आहेत. ही बाब जाणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यात्रेनिमित्त होणारे धार्मिक विधी व पालखी सोहळ्याचे थेट फेसबुकच्या माध्यमातून प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा सोहळा आता घरबसल्या भक्तांना https://www.facebook.com/shree-kedarling-chaitra-yatra-2021-111609994400299 यावर पाहता येणार आहे.