शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित : पाण्याच्या शोधात आले होते पाच गवे; वनविभागाचा अंदाज : कळप जंगलात परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:17 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर गवत मंडई येथून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री आढळलेेल्या गव्यांचा कळप शनिवारी पहाटे परत ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर गवत मंडई येथून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री आढळलेेल्या गव्यांचा कळप शनिवारी पहाटे परत त्यांच्या अधिवासात, कोपार्डे परिसराजवळील जंगलात परतला आहे. पाण्याच्या शोधात हे पाच गवे शहरात आले असावेत, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.

शिंगणापूर रस्त्यावर शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्यासुमारास तीन गवे रस्त्यावरून जात असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी ही माहिती वन विभाग, अग्निशमन दल व पोलिसांना कळविली होती. सोशल मीडियावर ही माहिती फिरताच सर्वत्र शहरात गवे आले, गवे आले असा बोलबोला झाला. वन विभागाचे पथक रात्रभर शोधमोहीम राबवत होते. एका पिलासह पाच गवे शहरात आले होते. शनिवारी पहाटे वन विभागाच्या पथकाला हे पाच गवे सुरक्षितरित्या पुन्हा जंगल परिसरात परत पाठविण्यात यश आले. जंगल परिसरातील पाण्याचा साठा कमी झाल्याने पन्हाळ्याकडून हे गवे शहरात आले असावेत. शिवाय, ऊसतोडणी सुरू असल्यामुळे उसात राहणाऱ्या गव्यांना त्यांचा आसरा सोडावा लागत आहे, अशी माहिती वन अधिकारी सुधीर सोनवणे यांनी दिली.

वन विभागाची दोन पथके कार्यरत

सध्या शहरात कोणत्याही गव्याचा वावर नाही. तरीही वन विभागाच्या दोन पथकांकडून अजूनही शहर परिसरात काही गवे आले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. यामध्ये वन खात्याचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांचाही समावेश आहे. याशिवाय स्वयंसेवी संस्थेकडून मदत घेतली जात आहे. या शोधमोहिमेत व्हाईट आर्मीच्या जवानांनीही सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे.

कोट -

गवा हा अतिशय लाजाळू प्राणी आहे. तो केवळ स्वसंरक्षणार्थ हल्ला करू शकतो. कोणीही या प्राण्याच्या जवळ जाऊ नका, अंतर ठेवा. याशिवाय त्याला दगड मारणे, त्याच्यासोबत फोटो काढण्याच्या हेतूने जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, असे केल्यास तो बिथरण्याची शक्यता आहे. गवे दिसल्यास तत्काळ वन विभागाला कळवावे.

सुधीर सोनावणे,

वन अधिकारी (प्रादेशिक), कोल्हापूर

(संदीप आडनाईक)