शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

(सुधारीत )अतिवृष्टीने दाणादाण, पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST

जिल्ह्याला महापुराचा विळखा : प्रमुख ३३ मार्ग बंद : ११० बंधारे पाण्याखाली : एनडीआरएफ पथक दाखल चंदगड तालुक्यातील पुराचा ...

जिल्ह्याला महापुराचा विळखा : प्रमुख ३३ मार्ग बंद : ११० बंधारे पाण्याखाली : एनडीआरएफ पथक दाखल

चंदगड तालुक्यातील पुराचा पहिला बळी : कडलगे येथील ओढ्यावरून एकजण वाहून गेला

स्थलांतर सुरू : पंचगंगा ४१ फुटांवर

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ढगफुटीसदृश पडणाऱ्या पावसाने जिल्हाभर हाहाकार केला असून सर्वच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीने गुरुवारी दुपारी दोन वाजता इशारा पातळी ओलांडत धोका पातळीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली. रात्री आठ वाजता पाणीपातळी ४१ वर पाेहोचली. जोर कायम राहिल्यास मध्यरात्रीच पंचगंगा धोका पातळी ओलांडणार आहे. ११० बंधारे पाण्याखाली गेले असू्न ८ राज्य मार्ग आणि २५ जिल्हा मार्ग असे एकूण ३३ मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले आहेत. महापुराची परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच एनडीआरएफची दोन पथके संध्याकाळी दाखल झाली. दरम्यान, संभाव्य धोका पाहता नदीकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. बर्की (ता. शाहूवाडी) गावाचा संपर्क तुटला असून संपर्क तुटलेल्या गावांची संख्या आणखी वाढणार आहे. दरम्यान, चंदगड तालुक्यातील कडलगे येथील ओढ्यावरून एकजण वाहून गेल्याने हा या पावसाळ्यातील पहिला बळी ठरला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाल्याचे निमित्त होऊन जिल्ह्यात मंगळवारपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. बुधवारपासून सुरू झालेला पावसाचा धिंगाणा गुरुवारीही कायम होता. गुरुवारी मध्यरात्रीपासून ते गुरुवारी दिवसभर पावसाने अक्षरश: थैमान घातले. धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह डोंगराळ तालुक्यात, तर ढगफुटीसदृश अवघ्या काही तासांतच विक्रमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे नदी-नाले भरून वाहू लागल्याने जिल्ह्यातील दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

वारणेत २२ हजार क्युसेकचा विसर्ग

पाऊस वाढल्याने वारणा धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सकाळी ११२५ असणारा विसर्ग संध्याकाळपर्यंत २२ हजार क्युसेकवर गेल्याने वारणा नदीकाठाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी ७५ टक्के, काळम्मावाडी ६० टक्के, वारणा ८६ टक्के, तुळशी ६८ टक्के भरले आहे. पावसाचा असाच जोर राहिल्यास राधानगरी व काळम्मावाडी वगळता अन्य धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे पाटबंधारेने कळवले आहे.

घाट मार्ग बंद

पावसामुळे ३३ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले आहेत. यात कोल्हापूर ते रत्नागिरी, गगनबावडा, चंदगड, गारगोटी, कागल-मुरगूड, उत्तूर ते गडहिंग्लज, चंदगड या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. भुईबावडा, करुळ घाटात दरड कोसळल्याने कोकणात जाणारी वाहतूक आंबोली व फोंडा घाटामार्गे वळवण्यात आली आहे, पण तेथे अनेक लहान-मोठ्या ओढ्यांवर पाणी आल्याने राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. आंबा घाटात रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. व्हिक्टोरिया पुलावर पाणी आल्याने आजरा ते गोवा वाहतूक बंद झाली आहे.

पाऊस रविवारपर्यंत कोसळणार

पाऊस रविवारपर्यंत असाच कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पूर आणि दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

राधानगरी धरण ७५ टक्के भरले

राधानगरी धरण ७५ टक्के भरले आहे. ९७ टक्के भरल्याशिवाय धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडत नाहीत. त्यामुळे सध्या फक्त सांडव्यावरून १४२५ क्युसेक पाण्याचा भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू असल्यामुळे पाणीपातळीत वाढ होत आहे. बुधवारी धरणातील पाणीसाठा ५९ टक्के होता. तो गुरुवारी सायंकाळपर्यंत तब्बल ७५ टक्क्यावर पाेहोचला. २४ तासांत तब्बल १६ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

अलमट्टीतून ९७ हजार क्युसेक विसर्ग

पाऊस वाढल्याने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सद्य:स्थितीत प्रति सेकंद ९७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कोल्हापूर, सांगलीतील पंचगंगा, कृष्णेचे पाणी वेगाने पुढे सरकत आहे.

दर तासाला ५ ते ६ इंचाने पाणीपातळीत वाढ

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत तर तासाला ५ ते ६ इंचाने वाढ झाली. राजाराम बंधाऱ्याजवळ दिवसभरात ८ फुटाने पाणीपातळी वाढली. संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्यानंतर तासाला १० इंचाने पाणी वाढले. त्यामुळे पाच वाजता ४० फुटावर असणारी पंचगंगा साडेसात वाजताच ४१ फुटावर पोहोचली.

अशी वाढली पाणीपातळी

सकाळी ७ : ३५.०७

सकाळी ८ : ३५.११

दुपारी १२ : ३७.११

दुपारी १ : ३८. ००

दुपारी २ : ३९.००

दुपारी ३ : ३९.०२

दुपारी ४ : ३९.०६

संध्याकाळी ५ : ४०.००

संध्याकाळी ७ : ४०. ६

रात्री ८ : ४१.००

डोंगराळ तालुक्यात ढगफुटी

चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावड्यात १५० ते २०० मिलीमीटर पाऊस अवघ्या १२ तासांत पडला आहे. त्याचवेळी कागल, करवीर, हातकणंगले, शिरोळमध्ये ८० ते १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकट्या धामणी खोऱ्यात २२३ मिलिमीटर प्रचंड पाऊस पडला आहे.

प्रमुख धरणातून विसर्ग क्युसेकमध्ये

राधानगरी - १४२५

तुळशी ००

वारणा - ११२५

कासारी - ५५००

कुंभी - ७८०

दूधगंगा - ००

पाटगाव- २२०

अलमट्टी ९७०००

हिप्परगी ७४०००

११० बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.

भोगावती नदी : राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव.

तुळशी नदी : बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी, कांचनवाडी, चांदे व भाटणवाडी, कोते

कासारी नदी : यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण व वालोली.

कुंभी नदी : शेनवडे, कळे, वेतवडे, आसळज, मांडुकली व सांगशी.

धामणी नदी : पनोरे, गवसी, म्हासुर्ली, सुळे व आंबर्डे,, शेळोशी,

वारणा नदी : चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी.

कडवी नदी : वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवतेसावर्डे व सरुडपाटणे.

दुधगंगा नदी : सिद्धनेर्ली, सुळकूड बाचणी, दत्तवाड, सुळंबी, तुरंबे व कसबा वाळवे.

वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, करडवाडी, शेणगाव, शेळोली, कडगाव, सुक्याची वाडी, तांबाळे, अनप व दासेवाडी.

हिरण्यकेशी नदी : साळगाव, ऐणापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, चांदेवाडी, देवर्डे, दाभीळ, हजगोळी, जरळी, हरळी व भादवण, गजरगाव,

घटप्रभा नदी : कानडे सावर्डे, पिळणी, बिजूर भोगाली, हिंडगाव,तारेवाडी, अडकूर व कानडेवाडी,

ताम्रपर्णी नदी : कोवाड, चंदगड, कुर्तनवाडी व हल्लारवाडी,

चित्री नदी : कारपेवाडी, चिकोत्रा नदीवरील- कासारी, वडगांव, अर्जुनवाडा, मेतके व गलगले

धरणातील पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये )

राधानगगरी १७४.८३

तुळशी ६७.२१

वारणा ८३८.५२

दूधगंगा ४३०.३३

कासारी ६१.७१

कडवी ५९.५९

कुंभी ६३.९५

पाटगाव ८१.४२

चिकोत्रा २७.६०

चित्री ४१.४७

जंगमहट्टी १८.०४

घटप्रभा ४४.१७

जांबरे २३.२३

आंबेआहोळ २१.८४

२०१९ च्या पुराच्या आठवणी ताज्या

केवळ दोन दिवसांच्या पावसानेच जिल्ह्याला महापुराचा वेढा पडला आहे. प्रचंड पाऊस आणि वेगाने वाढत असलेले पाणी पाहून २०१९ च्या प्रलंयकारी महापुराच्या आठवणी ताज्या होत आहेत. पुराचे पाणी शिरणाऱ्या भागातील नागरिकांची सामानाची बांधाबांध सुरू झाली असून जनावरे सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याची घाई सुरू झाली आहे.