शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

‘आयजीएम’चे आरोग्य सुधारणार

By admin | Updated: November 25, 2014 21:52 IST

आयसीयुबरोबर ट्रामा केअर सेंटर : ३५० खाटांच्या आधुनिक हॉस्पिटलसाठी ३१ कोटींचा प्रस्ताव

राजाराम पाटील - इचलकरंजी -येथील नगरपालिकेच्या आयजीएम दवाखान्याला नवसंजीवनी देण्याबरोबरच अतिदक्षता विभाग, अपघातग्रस्तांवर शस्त्रक्रिया व उपचार असे ३५० खाटांचे आधुनिक हॉस्पिटल करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. साधारणत: ३१ कोटी रुपये खर्चाच्या योजनेसाठी केंद्राच्या नागरी आरोग्य अभियानातून निधी आणण्याचा निर्धार आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला आहे.नगरपालिकेला शंभर वर्षे पूर्ण झाली असून, पालिकेकडे केईएम हॉस्पिटल हे हॉस्पिटल होते. नगरपालिकेने ३५० खाटांची क्षमता असलेले नवीन इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल बांधल्यानंतर केईएममधील ७५ खाटांचा दवाखाना हलविला. सध्याच्या गोकुळ चौकातील आयजीएम हॉस्पिटलच्या इमारतीत सध्या १७५ खाटांचा दवाखाना गेली अठरा वर्षे सुरू आहे. पालिकेकडे जकात सुरू असताना दवाखान्याचा खर्च पालिकेला पेलावत होता. जकात बंद झाली आणि शासनाकडून मिळणाऱ्या विशेष अनुदानावर पालिकांचा खर्च सुरू आहे.पालिका कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन देण्यात आले. त्यामुळे अतिरिक्त बोजा पडलेल्या पालिकेला सातत्याने नुकसानीत असलेल्या आयजीएम दवाखान्याचा खर्च पेलवत नसल्याने ‘आयजीएम’ च आजारी आहे. नागरिकांना आरोग्याची जीवनावश्यक सेवा पुरविण्यासाठी आयजीएमला केंद्र सरकारच्या नागरी आरोग्य अभियानातून किंवा तत्सम योजनांतून निधी आणून दवाखान्याला नवसंजीवनी देण्याचा विडा आमदार हाळवणकर यांनी उचलला आहे.आयजीएमकडे सध्या १७५ खाटांचा दवाखाना सुरू आहे. त्यामध्ये आता ३५० खाट सुरू करण्यासाठी विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. दवाखान्याकडे सध्या देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा व उपक्रमांबरोबरच नवीन अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार असून, अपघातग्रस्तांसाठी शस्त्रक्रिया व उपचार करण्याचे केंद्रसुद्धा नव्याने उभारणार आहे. अतिदक्षता विभागाकडील विविध उपकरणे व यंत्रसामग्रीला एक कोटी ४३ लाख रुपये खर्च येणार आहे. प्रयोगशाळेसाठी १० लाख रुपये, अपघातग्रस्त शस्त्रक्रिया व उपचार केंद्रासाठी ७८ लाख रुपये, डायलेसीस युनिटसाठी ४० लाख रुपये, रेडीओलॉजी विभागाकडे ११ कोटी १५ लाख, नवजात बाळांच्या विभागासाठी १० लाख २० हजार, नेत्रविकार विभागासाठी ३३ लाख, कान-नाक-घसा विभागासाठी १८ लाख ४० हजार, फिजिओथेरपीकडे ५.५ लाख, दंत विकार विभागासाठी ८ लाख रुपये, शस्त्रक्रिया विभागासाठी ११ लाख, मेडिकल व सर्जीकल वॉर्डासाठी उपकरणे व फर्निचर दोन कोटी ६९ लाख रुपये, औषध खरेदी ३ कोटी रुपये असा खर्च येणार आहे.हॉस्पिटल ३५० खाटांचे करण्यास नवीन वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ, परिचारीका, कर्मचारी नेमावे लागणार आहेत. त्यांचा खर्चसुद्धा पाच कोटी ६० लाख रुपये आहे. त्यामध्ये डॉक्टरांपासून शिंपी, प्लंबर, न्हावी, सुतार, ड्रायव्हर, याशिवाय चतुर्थ श्रेणीतील १३९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.इमारत दुरूस्तीसाठी३.५ कोटी सध्याची ‘आयजीएम’ ची इमारत व तिच्याकडील विजेचे फिटींग-सॅनिटेशन व्यवस्था वीस वर्षांपूर्वीची असल्याने ती अत्यंत खराब झाली आहे. म्हणून इमारत दुरूस्ती, विजेचे फिटींग, सॅनिटेशन, आदींवर ३.५ कोटी रुपये खर्चावे लागणार आहे. तर इतर खर्च ६८ लाख रुपये होणार आहे.