शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षेसाठी शेतीव्यवस्था सुधारावी

By admin | Updated: January 6, 2015 00:50 IST

यशवंतराव थोरात : यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे व्याख्यान

कोल्हापूर : देशातील दारिद्र्य, भूकबळी असे प्रश्न सोडविण्यासाठी अन्नसुरक्षेशिवाय पर्याय नाही. अन्नसुरक्षेची अंमलबजावणी करावयाची असेल, तर शेतीव्यवस्था पहिल्यांदा सुधारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज, सोमवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘अन्नसुरक्षेतील समस्या : उपभोग किंवा नाश होणे’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. मानव्यशास्त्र सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, तर स्कूलचे संचालक डॉ. वसंत जुगळे प्रमुख उपस्थित होते.डॉ. थोरात म्हणाले, अन्नसुरक्षेची अंमलबजावणी केल्यास देशातील दारिद्र्य, भूकबळी असे प्रश्न निश्चितपणे सोडविता येतील. अन्नाला शेतीशिवाय पर्याय नसल्याने उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीव्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. शिवाय नागरिकांनी शाकाहार घेणे, पाण्याचा मर्यादित आणि गरजेनुसार वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. भरडधान्याचे उत्पादन म्हणजे शेती नव्हे. जीवनसत्त्वयुक्त अन्नधान्यांचे उत्पादन म्हणजे खऱ्या अर्थाने शेती आहे. बदलती ‘फूड हॅबिट’ हे देशासमोरील मोठे आव्हान बनले आहे. फळे आणि मांसाहाराकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. त्यातून प्रदूषणवाढीला हातभार लागत आहे. प्रदूषण टाळण्यासह अन्नसुरक्षेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निसर्गास अनुकूल शेती करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सध्याच्या युवकांनी कार्यरत व्हावे.डॉ. भोईटे म्हणाले, गेल्या काही वर्षांतील हवामानाची स्थिती पाहता दुष्काळाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. वर्षागणिक त्यात भर पडत आहे. यापुढे दुष्काळाची परिस्थिती अधिक गडद होईल असे वाटते. अशा स्थितीत टिकून राहणे, तिला सामोरे जाण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती, पाणी, आदींचा योग्य पद्धतीने वापर करणे उपयुक्त ठरणारे आहे. कार्यक्रमात वैशाली भोसले यांनी स्वागत केले. कविता वडाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)