शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आश्वासित प्रगती’ची अंमलबजावणी कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी हे सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी आणि त्यापासून मिळणाºया लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाने याबाबत लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचाºयांतून होत आहे.एकाच पदावर सलग २४ वर्षे काम केलेल्या; परंतु पदोन्नती न मिळू शकल्याने निर्माण झालेली कुंठितता घालविण्यासाठी सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी हे सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी आणि त्यापासून मिळणाºया लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाने याबाबत लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचाºयांतून होत आहे.एकाच पदावर सलग २४ वर्षे काम केलेल्या; परंतु पदोन्नती न मिळू शकल्याने निर्माण झालेली कुंठितता घालविण्यासाठी सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना शासनाने लागू केली. ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली असली, तरी आदेशाच्या दिनांकाला जे सेवेत कार्यरत आहेत, त्यांनाच या योजनेचे लाभ अनुज्ञेय करण्याचा निर्णय घेतलेला आहे.यानुसार दि. १ आॅक्टोबर २००६ ते ३१ मार्च २०१० या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयांना हा लाभ अनुज्ञेय नव्हता. आता सुधारित नव्या आदेशानुसार संबंधित कर्मचाºयांना या योजनेअंतर्गत दुसरा लाभ अनुज्ञेय झाला आहे. नवा आदेश दि. ९ डिसेंबर २०१६ रोजी निर्गमित झाला आहे. हा आदेश शिवाजी विद्यापीठास लागू आहे.सन २००६ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना हा लाभ अनुज्ञेय आहे. आजपर्यंतचा कालावधी बघता हा निर्णय त्वरित लागू होणे गरजेचे आहे, अशी मागणी काही सेवानिवृत्तांनी अर्जाद्वारे केली आहे. मात्र, अद्यापही कार्यवाही झालेली नाही. कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी विद्यापीठ सेवक संघाच्या शिष्टमंडळाला प्रशासनाने आज, शुक्रवारी चर्चेसाठी बोलविले आहे. यामध्ये ‘आश्वासित प्रगती’ योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा व्हावी, अशी मागणी संंबंधित सेवानिवृत्त कर्मचाºयांकडून होत आहे.सुधारित शासकीय आदेश लागू होऊन आठ महिने पूर्ण होत आले, तरी अद्यापही या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाकडून कार्यवाही झालेली नाही. विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याची सेवानिवृत्त कर्मचाºयांची मागणी आहे.- प्रभाकर भोसले,सेवानिवृत्त कर्मचारी, शिवाजी विद्यापीठ