शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे यंत्रमाग कामगार गृहनिर्माण योजनेसाठी घेण्यात आलेल्या दहा एकर जागेवर नगरपालिकेच्यावतीने यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना राबवावी. त्याठिकाणी शासकीय योजनेतून घरकुले बांधून द्यावीत, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कामगार व माजी आमदार नरसय्या आडाम यांनी सोमवारी नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांच्याकडे केली. इचलकरंजी ...

ठळक मुद्देकोंडिग्रे येथील जागेवर घरकुले बांधून द्यावीत
लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे यंत्रमाग कामगार गृहनिर्माण योजनेसाठी घेण्यात आलेल्या दहा एकर जागेवर नगरपालिकेच्यावतीने यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना राबवावी. त्याठिकाणी शासकीय योजनेतून घरकुले बांधून द्यावीत, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कामगार व माजी आमदार नरसय्या आडाम यांनी सोमवारी नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांच्याकडे केली.इचलकरंजी पालिकेच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेतून राबविण्यात येत असलेल्या घरकुल योजनेबाबतची माहिती आडाम यांनी घेतली. यंत्रमाग कामगारांसाठी सोलापूर धर्तीवर घरकुले बांधून द्यावीत, असेही त्यांनी सांगितले. तेव्हा पालिका हद्दीत जागा उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यावर आडाम यांनी शहरापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत घरकुल योजना राबविता येते. त्याप्रमाणे कोंडिग्रे येथील जागेवर घरकुले बांधून द्यावीत, असे सूचित केले.दरम्यान, अंध-अपंग लाभार्थ्यांची यादी नगरपालिकेने निश्चित केली नसल्याबद्दल आडाम यांनी जाब विचारला. त्यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दोन दिवसांत यादी तयार करण्यात येईल, असे सांगितले. शिष्टमंडळातील दत्ता माने यांनी यादी तयार न झाल्यास ९ आॅगस्टला आंदोलनाचा इशारा दिला. कामगार नेते ए. बी. पाटील, भरमा कांबळे, नगरसेवक तानाजी पोवार, सागर चाळके, विठ्ठल चोपडे, युवराज माळी, राहुल खंजिरे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, आदी उपस्थित होते.....अन्यथा विधानसभेत घुसू : नसरय्या आडाम इचलकरंजी : राज्यातील यंत्रमाग कामगारांचा किमान वेतनाचा प्रश्न सोडवून त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ११ आॅगस्टला विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास विधानसभेत घुसण्याचा इशारा कामगार नेते नसरय्या आडाम यांनी पत्रकार बैठकीत दिला. ते म्हणाले, शासनाने किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी टोलवाटोलवी केली. हा प्रश्न तत्काळ मार्गी लावून किमान वेतन द्यावे, असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, कामगारांना घरकुल बांधण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे, आदींसह कामगारांच्या मागण्यांसाठी लालबावटा जनरल कामगार संघटनेच्यावतीने मुंबई विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी पूर्वतयारी म्हणून सोमवारी कामगार मेळावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार बैठकीत आडाम यांनी मुख्यमंत्री चर्चेला न आल्यास विधानसभेत घुसून न्याय मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी दत्ता माने, भरमा कांबळे, कामिनी आडाम, आदी उपस्थित होते.