शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी पटसंख्येवर परिणाम--शाळा प्रवेशातील वयाचा गुंता....

By admin | Updated: November 20, 2014 00:01 IST

मराठी शाळांना नियमांचा फटका--

प्रदीप शिंदे -कोल्हापूर -शिक्षण खात्याने आखलेल्या शाळा प्रवेशाबाबत राज्यातील समान धोरणांतर्गत पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ५ वर्षे ११ महिने निश्चित केले जाणार आहे. मात्र, यापूर्वी पटसंख्या भरण्यासाठी पाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिलीमध्ये प्रवेश दिला गेल्याने शहरी भागात पुढील वर्षी पहिलीसाठी मुले उपलब्ध होणार नाहीत. याचा परिणाम सलग पाच वर्षांतील इयत्तेवर होणार आहे. मुले कमी असल्याने शिक्षक अतिरिक्त होण्याचे धोके वाढणार आहेत. या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे. वाढत्या स्पर्धेमुळे शिक्षणासाठी विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यापूर्र्वीच इयत्ता पहिलीमध्ये त्यांना प्रवेशित करण्याची पालकांची घाई सुरू असते. ते टाळण्यासह शाळाप्रवेशाच्या समान धोरणांतर्गत पहिलीच्या प्रवेशासाठी ५ वर्षे ११ महिने असे वय शिक्षण खात्याने निश्चित केले आहे. वयनिश्चितीच्या निर्णयामुळे शिक्षणासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर मुले-मुली पहिलीमध्ये प्रवेशित होतील. शिवाय त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण आत्मसात करता येईल. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मत शिक्षण विभागाचे आहे. शासनाने नवा प्रस्ताव मंजूर केल्यास ज्या मुलांचे वय जुलैमध्ये ५ वर्षे ११ महिने किंवा अधिक असेल, त्यांनाच पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. मात्र, सध्या शहरस्तरावरील पटसंख्या भरून काढण्यासाठी अनेक शाळांतून ५ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पालकांच्या मान्यतेने पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला गेला आहे. हा निर्णय झाला तर पुढील शैक्षणिक वर्षात पहिल्या इयत्तेला मुले कमी मिळतील आणि याचा परिणाम फक्त एक वर्ष न राहता पुढील पाच वर्षांतील इयत्तेवर होणार आहे. सरकारने जर या प्रस्तावास मंजुरी दिली, तर अनेक शिक्षक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शासनाचा हा निर्णय योग्य आहे. मात्र, कोल्हापूर शहरातील शाळेमध्ये पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिलीच्या इयत्तेमध्ये प्रवेश दिला जातो. अन्य जिल्ह्यांत तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र सहा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे निर्णय झाला तर कोल्हापूर शहरातील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा. याबाबत सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घ्यावा. घाईगडबडीत शासनाने कोणताही निर्णय घेतला आणि जर या निर्णयामुळे शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होणार असेल तर महासंघ शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करील. - संतोष आयरे, शहराध्यक्ष, राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघमराठी शाळांना नियमांचा फटकाशहरी भागात मुलांना इंग्रजी शाळेमध्ये दाखल करण्याकडे पालकांचा कल असल्याने महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेसह खासगी प्राथमिक शाळेतील पटसंख्येवर परिणाम होत आहे. त्यामुळे पटसंख्या वाढविण्यासाठी अनेक शाळांमध्ये पाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिलीच्या वर्गात दाखल केले आहे. त्यामुळे नव्या नियमाचा फटका लहान शाळांना बसण्याची शक्यता आहे. पटसंख्येअभावी अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण होणार आहे.शाळा प्रवेशातील वयाचा गुंता....यापूर्वी पाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिलीमध्ये प्रवेश दिल्याने शहरी भागात पुढील वर्षी पहिलीसाठी मुले उपलब्ध होणार नाहीत परिणाम सलग पाच वर्षांतील इयत्तेवर होणार शिक्षक अतिरिक्त होण्याचे धोके वाढणार पहिलीच्या वर्गात दाखल झालेल्या मुलांना नव्या नियमांचा फटका बसण्याची शक्यता