शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तात्काळ तिकिटांची आजपासून दरवाढ

By admin | Updated: December 24, 2015 23:46 IST

प्रवास महागला : प्रवाशांना फटका

मिरज : तात्काळ तिकिटांच्या दरात दि. २५ पासून १० ते ३० टक्के दरवाढ होणार असल्याने रेल्वे प्रवाशांसाठी तात्काळ तिकिटावर प्रवास महागडा होणार आहे. त्यातच स्लिपर श्रेणीसह वातानुकूलित दर्जाच्या प्रवासासाठी तात्काळ तिकिटाला आता दोनशे ते पाचशेपर्यंत दरवाढ होणार आहे. यामुळे तात्काळ तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. रेल्वेगाड्या नेहमीच फुल्ल असल्याने ऐनवेळी आरक्षण उपलब्ध होणाऱ्या तात्काळ आरक्षित तिकिटांना मोठी मागणी आहे. ओळखपत्राची सक्ती, तात्काळ तिकीट विक्रीसाठी स्वतंत्र वेळ, अशा उपाययोजना रेल्वे प्रशासनाने केल्या आहेत. तात्काळ आरक्षित तिकीट मिळविण्यासाठी रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रातील तिकीट खिडक्यांवर रांगा लागतात. विक्री सुरु झाल्यानंतर रेल्वे तिकीट खिडकीवर किमान अर्धा तास मिळणारी तात्काळ तिकिटे केवळ पाचच मिनिटात संपतात. यामुळे सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळणे दुरापास्त असल्याने, अनधिकृत तिकीट एजंटांकडून जादा दराने काळ्या बाजारात तात्काळ तिकीट घ्यावे लागते. आता रेल्वे प्रशासनाने तात्काळ तिकिटाच्या दरात आणखी वाढ करून तात्काळ तिकिटावरील प्रवास महाग केला आहे. प्रवाशांना तात्काळ रेल्वे तिकिटासाठी शुक्रवारपासून दहा ते तीस टक्के जादा पैसे मोजावे लागणार आहेत. तात्काळ रेल्वे तिकिटासाठी पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी स्लिपर श्रेणीसाठी जास्तीत जास्त २०० व प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणी वातानुकूलित बोगीसाठी ४०० ते ५०० रूपये तिकीट दर वाढणार आहे. द्वितीय श्रेणी आरक्षित बोगीसाठी दरवाढ कमी असल्याने जवळच्या प्रवासासाठी २५ ते ५० रूपये दरवाढ होणार असली तरी, वातानुकूलित बोगीच्या तात्काळ तिकिटासाठी किमान १०० ते २०० रूपये जादा द्यावे लागणार आहेत. तात्काळ आरक्षित तिकिटे अनधिकृत एजंटांकडून जादा दराने घ्यावी लागतात. त्यातच आता रेल्वेने दरवाढ केल्याने तात्काळ तिकिटावर प्रवास करणे सर्वसाधारण प्रवाशांसाठी अवघड होणार आहे. (वार्ताहर)साधारण आरक्षित तिकिटापेक्षा तात्काळ आरक्षित तिकिटासाठी स्लिपर श्रेणीसाठी १०० व एसीसाठी ३०० रूपये जादा आकारणी करण्यात येते. मिरज ते मुंबई द्वितीय श्रेणीतून प्रवासासाठी तात्काळ तिकीट दर ३७५ ऐवजी ३९५ रूपये होणार आहे. मिरज ते मुंबई एसीतून प्रवासासाठी १३०० ऐवजी आता १५०० रूपये द्यावे लागणार आहेत.नवीन कमाल दरवाढ द्वतीय श्रेणी - २०० रूपयेबैठक आरक्षण - १५एसी चेअर कार - ४००एसी प्रथम व द्वितीय श्रेणी- ५००एसी तृतीय श्रेणी - ४००