शहरं
Join us  
Trending Stories
1
हमराज मुव्हीची स्टोरी अन् शिलाँगला निघण्यापूर्वी राजाचे व स्वत:चे केलेले वजन; राजाच्या भावाचा सोनमबाबत मोठा दावा
2
हे आहेत सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेले टॉप १० देश, ५ मुस्लीम बहुल देशांचाही समावेश; आफ्रिकेतील हिंदू लोकसंख्येनं चकित केलं 
3
राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....
4
ऑपरेशन सिंदूर: भारताच्या तडाख्यात झाली उद्ध्वस्त, ती ठिकाणे पाकिस्तानने झाकली
5
त्याची मला रुखरुख लागेलच... राज ठाकरेंचे मनसैनिकांना खुले पत्र; आणखी काय म्हणाले?
6
दोन फॉलोअर्स कमी झाले, पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, पोलीसही समजावून सांगून थकले, शेवटी...
7
WTC Final : आधी निर्धाव षटकांचा मारा! मग रबाडानं टाकली डबल विकेट ओव्हर; ख्वाजावर ओढावली ही नामुष्की
8
'बालिका वधू'फेम अविका गौरचा झाला साखरपुडा, खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
9
पाकिस्तानी पत्रकारांनी शाहबाज सरकारला दाखवली जागा, भर पत्रकार परिषदेत केला अर्थमंत्र्यांचा अपमान!
10
Health Tips: ५१ व्या वर्षीही गौर गोपाल दास दिसतात फिट; काय असतो साधूंचा डाएट?
11
लॉस एंजेलिसमध्ये ५ दिवसांपासून निदर्शने सुरू, ट्रम्प यांनी मरीन अन् नॅशनल गार्ड तैनात केले; विरोधाचं नेमकं कारण काय?
12
बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टी वधारले, इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' शेअर्सनी मारली बाजी
13
४४० व्होल्टचा झटका! ना पोल, ना कनेक्शन... ८२ हजारांचं पाठवलं वीज बिल, काय आहे हे प्रकरण?
14
अमेरिकेची डबल खेळी! ट्रम्प प्रशासनाला पाकिस्तान सोपवणार 'खजिना'?; भारतासोबत चीनचीही झोप उडणार
15
'आभाळमाया'तील चिंगी आता दिसते अशी, लग्नात घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे सगळीकडून झालेलं कौतुक
16
अरे बापरे...! MBBS झालेल्यांचे हाल पहा, 60 मेडिकल कॉलेजमध्ये फुकटात काम करून घेतायत, इतर ठिकाणी ५०००...
17
'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; कर्नाटक सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर
18
लायबेरियन जहाज बुडाल्याप्रकरणी कारवाई; मालक अन् क्रू'वर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
19
भारतात श्रीमंतांचा आकडा वाढला! 'या' देशांना टाकले मागे, तुम्हीही यादीत आहात का?
20
"होय, पती राजाच्या हत्येच्या षडयंत्रात मी सहभागी होते..."; सोनम रघुवंशीचा कबुलीनामा

ई-फार्मसीद्वारे विक्री बेकायदेशीर

By admin | Updated: July 7, 2015 01:11 IST

जगन्नाथ शिंदे : लोकांच्या जिवाशी खेळ

कोल्हापूर : ई-फार्मसी हा बेकायदेशीर व्यवसाय असून, सध्याचे कायदे ई-फार्मसी चालविण्याची परवानगी देत नसल्याचे मत आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टचे (एआयडीओ) अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, सध्या आॅनलाईन फार्मसीज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या औषध कायद्यांकडून प्रतिबंधित असलेल्या औषधांचा पुरवठा दिलेल्या कायद्यांचे पालन न करता करतात. एकीकडे सरकार नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक घटकांचा वापर असलेल्या औषधांचा तसेच अँटिबायोटिक्सचा गैरवापर टाळण्यासाठी नवीन नियम व नियमावली आणत आहे. त्यावेळी ही औषधे या आॅनलाइन फार्मसींमध्ये मुक्तपणे उपलब्ध असतील. औषधांची विक्री कोणत्याही नियम तसेच नियंत्रणाविना केल्याने सार्वजनिक आरोग्यासाठी ती धोकादायक ठरू शकतात. ‘ई फार्मसी बिझनेस मॉडेल’ला या परिस्थितीत परवानगी देणे धोकादायक ठरेल. काही संस्थांच्या केवळ व्यापारी नफ्यासाठी सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेसोबत खेळ केल्यासारखे होईल. एआयओसीडी मागणी करते, की डीसीजीने (आय) इंटरनेट औषध व्यापाराबाबत भेदभावरहित भूमिका घेण्यापासून थांबवण्याबाबत सूचना देणे तसेच लोकांना त्याच्या शक्य असलेल्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे शिंदे म्हणाले.