शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

कोथळीत अवैधरीत्या दारूचा बाजार

By admin | Updated: April 4, 2016 00:45 IST

दारूबंदीचा ठराव कागदावरच : शासनमान्य दुकान नसतानाही दारूची खुलेआम विक्री

संतोष बामणे ल्ल जयसिंगपूर शिरोळ तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून कोथळी (ता़ शिरोळ) या गावाची ओळख आहे़ दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गावाला एक दिवसाआड अर्धा तास पाणी सुरू केले आहे़ याप्रमाणेच ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर झाला आहे़ मात्र, गावात एकही शासनमान्य दारूचे दुकान नसताना अवैधरीत्या दारू विक्री राजरोसपणे सुरू असल्याने महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़ २६ जानेवारी २०१६ला झालेल्या ग्रामसभेत एक ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेत झाला होता़ त्याचबरोबर गावात एकही शासनमान्य दारूचे दुकान नसल्यामुळे कोथळी गावाने दारूबंदीचा ठराव मंजूर करून घेतला आहे़ सध्या एक आदर्श गाव म्हणून वीज बचत, पाणी बचत, विविध योजना, ग्रामपंचायत निवडणुका, सोसायटी, पतसंस्था, विविध संस्था यांच्या निवडणुका बिनविरोध करून गाव एकजूट असल्याचा पुरावा सांगत आहे़ सध्या गावात वडाप बंद करून एस.टी. सेवा पूर्णपणे वापरात घेतल्यामुळे महामंडळापुढेही कोथळी गावाने आदर्श निर्माण केला आहे़ ग्रामसभेत झालेल्या दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर झाला होता़ काही वर्षांपूर्वी गावातील महिलांनी एकत्र येऊन गावठी, देशी-विदेशी दारूची खुलेआम होणारी विक्री रोखण्यासाठी २००८ मध्ये आंदोलन छेडले होते़ गावातील सर्व अवैधरीत्या चालणारे दारूअड्डे उद्ध्वस्त केले होते़ मात्र, काही दिवसांनी छुपे-चोरी दारू विकण्याचे प्रकार वाढून आज गावात अवैधरीत्या दारूची सहा ते सात ठिकाणी सर्रास विक्री सुरू आहे़ येथे १ एप्रिलपासून उरुसाला सुरुवात होणार असल्याने मोठ्या प्रमाणात दारूची मागणी लक्षात घेता अवैधरीत्या दारूविक्रेत्यांनी दारूचा साठा मोठ्या प्रमाणात केल्याचेही समजते़ हा साठा मोडून काढण्यासाठी जयसिंगपूर पोलिस काय भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे़ ग्रामपंचायतीचा ठराव व कोणतीही होत नसलेली कार्यवाही त्यामळे पुन्हा एकदा दारूबंदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ तसेच कोथळी-जयसिंगपूर मार्ग, मंगेश्वर माळ, एस़टी़स्टॅण्ड, लक्ष्मीनगर व गावच्या मध्यवस्तीत अवैधरीत्या दारूची खुलेआम विक्री होत असल्याने महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्तहोत आहे़ प्रशासनाचे दुर्लक्ष कोथळी येथे शासनमान्य दारूचे एकही दुकान नाही़ असे असताना सध्या गावात अवैधरीत्या सहा ते सात ठिकाणी खुलेआम दारूची विक्री होत आहे़ मात्र, या अवैधरीत्या होणाऱ्या दारू विक्रीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होऊन अवैध दारू विक्रीला वाव मिळाला आहे़ मात्र गावात दारूबंदीसाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत दारू बंदीचा ठराव केला आहे़ ग्रामपंचायतीचा ठराव पोलिस ठाण्याला दिल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई केली होती़ मात्र, पुन्हा एक दा अवैध दारू विक्र ीने उभारी घेतली आहे़ तर यावर निर्बंध घालण्यासाठी सर्व सदस्यांचे मत घेऊन पोलिस ठाण्याला पुन्हा एकदा निवेदन देणार आहेत़ - सुप्रभा इंगळे, सरपंच कोथळी