शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

वीस कोटींच्या थकबाकीकडे दुर्लक्ष : मनपा इस्टेट विभागाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:06 IST

भारत चव्हाण ।कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक बाजू कमकुवत असली तरी उपलब्ध असलेल्या उत्पन्नाच्या स्रोतातून शंभर टक्के वसुली झाली तर काही प्रमाणात आर्थिक परिस्थिती सुधारण्यास वाव आहे; परंतु दैनंदिन कामाची व्याप्ती, अपुरे मनुष्यबळ, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा अभाव, घेतलेल्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात होत असलेली टाळाटाळ, अशा विविध कारणांनी ...

ठळक मुद्देठोस भूमिका घेण्यास असमर्थ; विविध कारणांनी वसुलीत विघ्ने

भारत चव्हाण ।कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक बाजू कमकुवत असली तरी उपलब्ध असलेल्या उत्पन्नाच्या स्रोतातून शंभर टक्के वसुली झाली तर काही प्रमाणात आर्थिक परिस्थिती सुधारण्यास वाव आहे; परंतु दैनंदिन कामाची व्याप्ती, अपुरे मनुष्यबळ, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा अभाव, घेतलेल्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात होत असलेली टाळाटाळ, अशा विविध कारणांनी शंभर टक्के वसुलीत विघ्ने निर्माण झाली आहेत.गेल्या तीन वर्षांपासून मनपा मालकीच्या १५७५ दुकानांचे मासिक भाडेच जमा होत नाही.

मात्र, त्यांच्या वसुलीकरिता ठोस प्रयत्न होत नसल्याने या दुकानदारांकडे १८ ते २० कोटींची थकबाकी अडकून पडली आहे. जमा-खर्चाचा ताळमेळ घालण्याकरिता प्रशासन यावर्षी घरफाळा वाढविण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे; पण अशा थकबाकीकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष केले गेले आहे. दुकानदारांना कधी ना कधी ही थकबाकीची रक्कम व्याजासह भरावी लागणार असली तरीही ती भरण्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. ‘दुकानदार जातात कुठं’ असे म्हणत प्रशासनही गप्प आहे. दोन्ही बाजूंच्या निष्काळजीपणामुळे आणि अशा छोट्या थकबाकीमुळे महापालिकेचा हिशोब चुकत राहिला आहे.

राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार महापालिकेच्या दुकानगाळ्यांच्या भाड्यासाठी सध्याच्या रेडिरेकनरचा दर आधारभूत ठरविला आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१५पासून सुरू झाली आहे. त्यामुळे जेथे ६०० ते ८०० रुपये भाडे भरायला लागत होते तेथे आता नव्या नियमानुसार भाडे काही महत्त्वाच्या ठिकाणी ६५०० रुपयांपर्यंत पोहोचले. त्याला दुकानदारांनी विरोध केला. नवीन भाडे भरण्यास त्यांनी ठाम नकार दिला. मनपा प्रशासनानेही भाडेवाढीला विरोध करणाºयांचे भाडे करार वाढवून देण्यास नकार दिला. त्यामुळे करार संपूनही तीन वर्षे होत आली तरी भाडेवाढ आणि भाडे कराराचा प्रश्न सुटलेला नाही. परिणामी, वार्षिक साधारणपणे ६ ते ७ कोटी रुपयांचे हक्काचे उत्पन्न मनपाला मिळत नाही.

जनता बझार, महालक्ष्मी अन्नछत्र यांसह शाहूपुरीतील तुळजाभवानी मार्केटमधील १२ गाळेधारकांनी नवीन भाडेपद्धत स्वीकारून कराराची मुदत वाढवून घेतली.न्यायालयाने याचिका फेटाळलीमनपा प्रशासनाने रेडिरेकनरवर भाडे आकारणीची पद्धत सुरू केल्यामुळे विशेषत: शिवाजी व शाहू मार्केटमधील गाळेधारकांचे धाबे दणाणले आहेत. तेथील रेडिरेकनरचे दर इतर ठिकाणांपेक्षा जास्त असल्याने भाडेवाढीचा सर्वांत जास्त फटका त्यांना बसला आहे. त्यामुळे या मार्केटमधील सुमारे १०० हून अधिक गाळेधारक न्यायालयात गेले. त्यातील २५ गाळेधारकांची याचिका फेटाळली. त्यामुळे नवीन भाडे पद्धतीनुसार भाडे भरणे बंधनकारक आहे. मनपा प्रशासन ज्यांचे निकाल लागले अशांच्या दुकानगाळ्यांना नवीन भाडे आकारणी करणे आवश्यक असताना त्याकडे डोळेझाक करताना दिसत आहे.

नुसतीच कागदोपत्री कार्यवाहीनवीन भाडेवाढीसंदर्भात प्रशासनाने सर्व गाळेधारकांना वैयक्तिक नोटिसा देऊन भाडे भरण्यास बजावले. गाळेधारकांनी नोटीस घेतली; पण भाडे भरले नाही. तरीही प्रशासनाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. जे गाळेधारक भाडे तसेच थकबाकी भरणार नाहीत, अशांवर कारवाई म्हणून कायद्यातील तरतूद ८१ ब प्रमाणे दुकानगाळे ताब्यात घेण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत; पण आयुक्तांनीही या अधिकाराचा वापर केलेला नाही.सवलत मिळणे अशक्यराज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेने नवीन भाडे आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे त्यामध्ये सवलत मिळणे अशक्य आहे. जरी भविष्यात नवीन करार झाले तरी त्याची आकारणी ही १ एप्रिल २०१५ पासूनच होणार आहे. काही गाळेधारकांनी परवडत नाही म्हणून गाळा सोडला तरीही त्यांच्याकडील थकबाकी वसुली ही अन्य पर्यायी मार्गाने होणार आहे. त्यामुळे यातून कोणाची सुटका होणार नाही.- सचिन जाधव, इस्टेट विभागमहापालिकेचे एकूण दुकानगाळे - २३००कराराची मुदत संपलेल्या दुकानगाळ्यांची संख्या - १५७५१ एप्रिल २०१५ पासून रेडिरेकनरवर भाड्याची आकारणी सुरूदुकानदारांचा नवीन भाडे भरण्यास स्पष्ट नकारगेल्या तीन वर्षांत १८ ते २० कोटींची थकबाकी