शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे उत्पन्नवाढीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 18, 2016 00:41 IST

‘स्थायी’त आरोप : भाडेकरू न्यायालयात गेल्याचे ठेवले अंधारात

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या भाऊसिंगजी रोडवरील इमारतीमधील भाडेकरू न्यायालयात गेल्याबाबत प्रशासनाने अंधारात ठेवले. उत्पन्नवाढीसाठी गंभीरपणे लक्ष दिले जात नाही, असा आरोप शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. अध्यक्षा विमल पाटील अध्यक्षस्थानी होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.उत्पन्नवाढीसाठी जिल्हा परिषद वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप सदस्य धैर्यशील माने, संजय मंडलिक यांनी केला. ते म्हणाले, प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदेचे उत्पन्न कमी होत आहे. व्याजावर परिषद चालविण्याची वेळ आली आहे. भाऊसिंगजी रोडवरील इमारतीचा विकास झाल्यास चांगले उत्पन्न मिळणार आहे; परंतु या इमारतीमधील आताचे भाडेकरू न्यायालयात गेल्याची माहिती प्रशासनाने सदस्यांना दिली नाही. बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या जागेचा विकास करता येत नाही. परिणामी जिल्हा परिषदेचे नुकसान होणार आहे. त्या विषयावर सर्वच सदस्यांनी बांधकाम, सामान्य प्रशासनास टीकेचे लक्ष्य केले. मात्र या दोन्ही विभागांचे अधिकारी एकमेकांवर विषय ढकलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत राहिले. शेवटी विधी विभागाकडून न्यायालयात गेलेल्या भाडेकरूंशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. माने म्हणाले, जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप दरवर्षी होत असतो. साहित्याची कंपनी ठरविण्यात पारदर्शकता नसल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे वैयक्तिक लाभार्थ्यांना साहित्य न देता पैसे थेट खात्यावर जमा करावेत. अपंग कल्याण निधीतील लाभाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा शासनाचा नियम झाला आहे. त्याच धर्तीवर सर्वच विभागांचे पैसे लाभार्थ्यांच्या नावावर जमा करावेत. या विषयावर चर्चा झाली. खात्यावर जमा केल्यानंतर लाभार्थी साहित्य न घेता पैसे खर्च करतील, असाही एक मतप्रवाह समोर आला. मात्र साहित्य खरेदीत ‘ढपल्या’ची चटक लागणारे काहीजण त्याला विरोध करण्याच्या मानसिकतेत राहिले. त्यामुळे यावर एकमताने निर्णय झाला नाही. २२ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्याचे ठरले. सभापती अभिजित तायशेटे, सदस्य हिंदुराव चौगुले, भाग्यश्री पाटील, बाजीराव पाटील, उमेश आपटे यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.