शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

‘आयजीएम’चे साडेपाच कोटींचे अनुदान गमावले

By admin | Updated: May 21, 2017 00:35 IST

मदन कारंडे यांचा आरोप : हॉस्पिटल दोन महिन्यांत सुरू करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : नगरपालिकेकडून आयजीएम हॉस्पिटल शासनाकडे हस्तांतरित करून वर्षाला मिळणारे ५.५ कोटी रुपयांचे अनुदान गमावले आहे. मात्र, प्रति महिना सुमारे ४५ लाख रुपयांचा पगार अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावा लागत आहे. इमारती, यंत्रसामग्री अशी १५० कोटींची मालमत्ता शासनाला द्यावी लागली. याला दोन महिने उलटले आहेत. सत्तारूढ भाजपने दोन महिन्यांत गोरगरिबांचा हा दवाखाना पूर्ण क्षमतेने चालू करावा, असे आवाहन राजर्षी शाहू आघाडीचे प्रमुख नगरसेवक मदन कारंडे यांनी शनिवारी केले. पालिकेच्या सभागृहामध्ये विविध २२ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्ष अ‍ॅड. अलका स्वामी यांनी सभा आयोजित केली होती. सभेच्या सुरुवातीलाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निषेधाचा विरोधकांनी दिलेला ठराव भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी सभेमध्ये घेता येणार नाही, असे सांगितल्याने नगराध्यक्षांनी तो फेटाळला. याचवेळी सत्तारूढ व विरोधी नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नतीचा विषय चर्चेस आला असताना नगरसेवक कारंडे यांनी आयजीएम हॉस्पिटलकडील ६७ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन नगरपालिकाच देत आहे. सभागृहाला अंधारात ठेवून मुख्याधिकाऱ्यांनी अधांतरी असणाऱ्या त्या ४३ कर्मचाऱ्यांना सेवेत घेणारे परस्पर आदेश दिल्याबद्दल शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी टीका केली. तसेच नगरपालिकेवर कोणत्याही प्रकारचे बंधन नसताना त्या ४३ कर्मचाऱ्यांना सेवेत घेतल्याबद्दल आक्षेपही घेतला. अशाप्रकारे नगरपालिकेने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता व अनुदान गमावले असले तरी गोरगरिबांचे आयजीएम हॉस्पिटल कधी सुरू होणार याची शाश्वती मिळत नाही, असाही आरोप त्यांनी केला. या त्यांच्या आव्हानावर सत्तारूढ पक्षाला कोणतीही हमी देता आली नाही. सर्वांसाठी घरे अभियानांतर्गत ५८० घरकुलांच्या निर्मितीचा प्रस्ताव ‘म्हाडा’कडे मंजुरीस पाठविण्याचा ठरावही संमत झाला. यावेळी मात्र प्रधानमंत्री आवास योजनेतून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या घरकुलांच्या अनिश्चिततेबाबत विरोधकांनी जोरदार टीका केली. त्याला उत्तर देताना भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी या योजनेतील जाचक अटी शिथिल करण्याबाबत आणि बांधकाम परवाना असलेली अट काढण्याविषयी सरकारकडे विनंती करण्यात येईल, असे सांगितले. तसेच अभियंता सुभाष देशपांडे यांनी शहरातील २६ ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.सौरऊर्जा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता स्वतंत्रपणे जाहीर ई-टेंडर मागविण्यात येईल. तसेच हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारताना सुद्धा जाहीर निविदा मागविली जाईल, असे सत्तारूढ आघाडीने घोषित केल्यानंतर हा प्रस्ताव सर्वानुमते संमत करण्यात आला. अनधिकृत नळ पाण्याच्या जोडण्या अधिकृत करण्यासाठी एक महिना मुदतीची अभय योजना राबविण्यात येईल. तसेच शहरातील कचरा उठाव करण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉली भाड्याने पुरविण्याची निविदा मंजुरीचा विषय सत्तारूढ आघाडीने बहुमताने रद्द केला. निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क; ड्रेनेज कामावर टीकासभेमध्ये शहरात विविध ठिकाणी नगरपालिकेच्यावतीने करण्यात आलेले पॅचवर्क अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याबद्दल विरोधी व सत्तारूढ आघाडीकडील नगरसेवकांनी टीका केली. यावेळी पाणीपुरवठा समितीचे सभापती नितीन जांभळे यांनी भुयारी गटार योजनेमध्ये कोणतेही नियोजन नसल्याबद्दल कंत्राटदारांवर आरोप केला. तसेच ड्रेनेजचे पाईप जमिनीखालून घालण्यासाठी खुदाईच्या रस्त्यावर होणारे पॅचवर्क निकृष्ट असल्याचे सांगितले. भुयारी गटर योजनेच्या सुसूत्रतेसाठी आणि नियोजनासाठी लवकरच कंत्राटदाराबरोबर सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नगरसेवकांची बैठक आयोजित करण्याची ग्वाही नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.