शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘आयजीएम’चा कारभार सरकारकडे

By admin | Updated: February 10, 2017 00:49 IST

उच्च न्यायालयाकडे प्रतिज्ञापत्र : फेब्रुवारीअखेर बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची हमी

मुंबई/इचलकरंजी : इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयाचा (आयजीएम) कारभार फेब्रुवारी अखेरपासून नगरपंचायतीऐवजी राज्य सरकार पाहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सरकारनेच ही माहिती दिली.नगरपालिकेचा आयजीएम रुग्णालय शासनाने हस्तांतरित करून घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे रुग्णालय शासनाकडे वर्ग होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, शासनातर्फे रुग्णालयाकडे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची हमी दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर व न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांनी या रुग्णालयाची याचिका निकाली काढली. कर्जामध्ये बुडालेल्या नगरपंचायतीला आयजीएम रुग्णालयाचे कामकाज पाहणे अशक्य झाले. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाही नगरपंचायतीला पुरविणे अशक्य झाले. त्याशिवाय पुरेसे डॉक्टरही उपलब्ध नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. विविध उपकरणेही रुग्णालयात उपलब्ध नाहीत. परिणामी गरीब रुग्णांना महागड्या रुग्णालयात जाऊन सर्व चाचण्या कराव्या लागतात. नगरपंचायत रुग्णालय चालविण्यास सक्षम नसल्याने राज्य सरकारला हे रुग्णालय चालविण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका इचलकरंजीचे सामाजिक कार्यकर्ते उमेश खांडेकर व दत्ता पाटील यांनी यांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर १२ जानेवारीला झालेल्या सुनावणीत राज्य शासन आणि नगरपालिका यांनी पुढील सुनावणी (९ फेब्रुवारी)पर्यंत नव्याने भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यावर राज्य सरकारने गुरुवारच्या सुनावणीत आयजीएम रुग्णालय चालविण्याचा निर्णय घेतल्याचे खंडपीठाला सांगितले. यासंबंधी नगरविकास विभागाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सादर केले. इचलकरंजी नगरपंचायतीवर ९५ कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि उत्पन्न अवघे ४० कोटी रुपये आहे. नगरपंचायतीची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने राज्य सरकारने आयजीएमचा कारभार ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, टप्प्याटप्प्याने रुग्णालयाचा कारभार ताब्यात घेण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले. (प्रतिनिधी)न्यायालयाने याचिका काढली निकालीशासनातर्फे फेब्रुवारीअखेर रुग्णालयाकडील बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची हमी दिली. त्यावर न्यायालयाने रुग्णालय टप्प्याटप्प्याने ताब्यात घेऊन सुरू करण्याचे आदेश देत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.