शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी विवाह केल्यास दहा हजार रुपये

By admin | Updated: October 28, 2015 00:46 IST

सुधारित योजना : लाभ घेण्याचे आवाहन; खर्चात बचत करण्यासाठी उपक्रम

कोल्हापूर : सामूहिक विवाह योजनेत सहभागी न होता थेट विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह केल्यास दहा हजार रुपये भेट म्हणून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पूर्वीची सामूहिक विवाह योजना सुधारित केली असून, त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने सामूहिक शुभमंगल, नोंदणीकृत विवाह योजना सुरू केली. विदर्भातील शेतकऱ्यांबरोबरच इतर सर्व जिल्ह्यांतील शेतकरी, शेतमजुरांच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चात बचत होईल. गरीब शेतकरी व शेतमजूर यांच्यावर विवाह सोहळ्याचा आर्थिक बोजा पडू नये आणि त्यासाठी त्यांनी कर्ज घेऊ नये, या दृष्टीने ‘नोंदणीकृत विवाह’ या सर्वोत्तम उपाय आहे. विवाहेच्छुक जोडप्यांना कोणत्याही स्वयंसेवी संस्थेवर अवलंबून राहण्याची व सामुदायिक विवाह सोहळ्याच्या तारखेची वाट पाहण्याची गरज नाही. त्यांना स्वत:हून केव्हाही नोंदणी कार्यालयात जाऊन लग्न करता येईल. मुलींचा सामूहिक विवाह आयोजित केल्यास सामूहिक विवाहात सामील होणाऱ्या प्रतिजोडप्यास दहा हजार आणि सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्वयंसेवी संस्थेला प्रतिजोडप्यास दोन हजार इतके अनुदान शासनामार्फत देण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. डी. मोहिते यांनी सांगितले. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील दाम्पत्ये पात्र राहणार नाहीत. त्यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग तसेच आदिवासी विभागामार्फत स्वतंत्र योजना राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यकसामूहिक विवाह हे शक्यतो तालुकापातळीवर आयोजित करावेत आणि त्यांमध्ये तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. अर्थसाहाय्याकरिता सहभागी जोडप्यांनी व संबंधित स्वयंसेवी संस्थेने विवाहाची माहिती विशिष्ट नमुन्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.