शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दगडाला देतोय तो देवपण!

By admin | Updated: October 14, 2014 23:15 IST

शिक्षण केवळ इयत्ता तिसरी : कलेच्या जोरावर गडहिंग्लज तालुक्याची ठरतेय ओळख

संजय थोरात - नूल  -शिक्षण केवळ इयत्ता तिसरी. मराठी नीट बोलता येत नाही. हिंदी वाचता येत नाही; परंतु देवाने हाती दिलेल्या कलेच्या जोरावर गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे एक युवक दगडाला देवपण देतोय. सुरगीश्वर मठाचे मठाधिपती चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी या कलावंतास मठात आश्रय दिला आहे.बसाराम थावराजी गारसीम रजपूत (वय २८) असे या मूर्तिकाराचे नाव आहे. तीन वर्षांपासून सुरगीश्वर मठात तो वास्तव्यास आहे. मोफत जेवण, निवासाची सोय मठाने केली आहे. वयाच्या १०व्या वर्षापासून बसाराम दगडात रमलाय. सहा इंचापासून पाच फुटांपर्यंत तो दगडात वेगवेगळ्या देव-देवतांच्या सुबक व रेखीव मूर्ती घडवितो. आतापर्यंत त्याने पाचशेहून अधिक मूर्ती तयार केल्या आहेत. मठाच्या जीर्णोद्धारावेळी योगिनीची मूर्ती घडविण्यासाठी त्याला महास्वामीजींनी खास राजस्थानातून आणला आणि तो इथेच रमला.गणपती, हनुमान, दत्त, दुर्गामाता, काळभैरव, नंदी, महादेवाची पिंड, कासव अशा अनेक देवतांच्या मूर्ती तयार करताना काळ्या दगडातदेखील तो प्राण आणण्याचा प्रयत्न करतो. छायाचित्रात दाखविलेल्या हुबेहूब मूर्ती तयार करण्यात त्याचा हातखंडा आहे. शिवाय मंदिराची कोरीव आरास, घराच्या चौकटींच्या डिझाईनचेही तो काम करतो. गडहिंग्लजचे ग्रामदैवत काळभैरीच्या मंदिराचे कोरीव काम त्याने केले आहे. महाराष्ट्र-कर्नाटकातील अनेक मंदिरांत त्याने घडविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पोट भरण्यासाठी केवळ शिक्षणच लागते असे नाही, तर एखादी कलासुद्धा पोट भरण्यास पुरेशी असते. बालवयात मी सरस्वतीची उपासना केली. त्यामागून लक्ष्मी हाती आली, अशी प्रतिक्रिया बसारामने दिली. ही कला सातासमुद्रापार पोहोचवायची त्याची जिद्द आहे. त्यासाठी सुरगीश्वर मठाचे त्याला पाठबळ मिळत आहे.सुरगीश्वर मठात मुलांना मोफत वैदिक शिक्षण दिले जाते. कलावंताच्या कलेला चालना देण्यासाठी बसारामला मठात आश्रय दिला. तो आता मठाचा शिष्यच बनला आहे.- चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, मठाधिपती सुरगीश्वर मठ, नूलबसाराम रजपूत याने दगडात कोरलेल्या देवतांच्या विविध मूर्ती.