शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रुची घेऊन संशोधन केल्यास मिळते भरीव यश

By admin | Updated: January 2, 2015 00:58 IST

सुभाष खोत : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

कोल्हापूर : विषय अध्ययनात आणि संशोधनात रुची असेल तरच संशोधन क्षेत्रात भरीव यश संपादन करता येते. मला गणिताची सुरुवातीपासून आवड होती आणि म्हणूनच मी त्या संदर्भातील संशोधनाकडे वळलो, असे भारताचे युवा गणिततज्ज्ञ डॉ. सुभाष खोत यांनी आज, गुरुवारी येथे सांगितले. गणितातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा आंतरराष्ट्रीय रॉल्फ नॅवेलिना पुरस्कार पटकाविणाऱ्या डॉ. खोत यांच्यासोबत चर्चेने आज शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी नववर्षाचा प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात त्यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, तर बी.सी.यू.डी. संचालक डॉ. अर्जुन राजगे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, डॉ. खोत यांच्या मातोश्री डॉ. जयश्री खोत प्रमुख उपस्थित होत्या.डॉ. खोत यांनी स्वत:च्या संशोधनाविषयी सोप्या शब्दांत तपशीलवार माहिती दिली. कोणतीही गणितीय व संगणकीय समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असणारे पद्धतशीर अल्गॉरिदम तयार करणे; ती समस्या सोडविण्यासाठी लघुतम मार्ग शोधणे हा आपल्या संशोधनाचा मूलभूत पाया आहे. संशोधन अधिक प्रभावी होण्यासाठी संशोधकांवरील अध्यापन व प्रशासकीय जबाबदाऱ्यांचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे संशोधनासाठी आवश्यक स्वातंत्र्य, स्वायत्तता देण्याबरोबरच आवश्यक निधीची तरतूद तसेच पुरस्कारांची योजना करण्याची आवश्यकता आहे. संशोधक आणि शिक्षक यांच्यामध्ये स्पर्धेऐवजी सामंजस्य व परस्पर विश्वासाची भावना वृद्धिंगत होण्याला खूप महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले.कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी डॉ. खोत यांच्यापासून प्रेरणा घेऊन संशोधनाच्या विविध क्षेत्रांत करिअर करण्यासाठी पुढे यावे.यावेळी विद्यापीठातर्फे डॉ. खोत आणि त्यांच्या मातोश्रींचा स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. आर. के. कामत यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)शंकांचे समाधान...सध्या न्यूयॉर्क विद्यापीठाच्या कोरंट इन्स्टिट्यूट आॅफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमध्ये संगणकशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ. खोत हे मूळचे इचलकरंजीचे आहेत. नव्या वर्षाची प्रेरणादायी सुरुवात करण्याचे ठरवून शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणण्याचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी ठरविले होते. त्यानुसार आज सकाळच्या सत्रात डॉ. खोत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या एकूण कारकिर्दीविषयी आणि संशोधनाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मनमोकळेपणे माहिती दिली आणि त्यांच्या शंकांचे समाधानही केले.