शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससारखा भामटेपणा कराल तर संघष

By admin | Updated: November 5, 2014 00:49 IST

रघुनाथदादांचा सरकारला इशारा : राजू शेट्टी कारखानदारांचे बाहुले असल्याची टीर्का

कोल्हापूर : भाजप सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित उसाचा दर द्यावा. कॉँग्रेस सरकारसारखेच तुम्हीही भामटेपणा करणार असाल तर रस्त्यावरील संघर्ष अटळ आहे, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सरकारला दिला. गेले वर्षभरात कोणत्या वस्तूची महागाई कमी झाली म्हणून राजू शेट्टी यांनी तीन हजारांची मागणी २७०० रुपयांवर आणली? यावरून शेट्टी हे कारखानदारांच्या हातातील बाहुले असल्याचे स्पष्ट होते, अशी टीकाही त्यांनी केली. नरेंद्र मोदी सरकारने आपल्या जाहीरनाम्यात उत्पादन खर्च व एकूण नफ्यातील ५० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांना उसाचा दर द्यावा, अशी अपेक्षा आहे. किमान या सरकारने चर्चेची तयारी दर्शविली आहे. या सरकारने निवडणुकीतील आश्वासने पाळली पाहिजेत. कॉँग्रेस सरकारसारखाच भामटेपणा केला तर संघर्ष अटळ असल्याचे पाटील यांनी सांगितले. नवीन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे माझे मित्र आहेत. त्यांनी ऊसदराबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. आता त्यांनी आश्वासने पाळावीत, एवढीच अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने गेल्या पाच-सहा वर्षांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कांदा उत्पादकांचे आंदोलन केले आणि त्यावेळी दोन-चार जागा पदरात पाडून घेतल्या. आताही तसेच आहे. भाजप सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी राजू शेट्टी यांनी धडपड सुरू केली आहे. म्हणूनच त्यांनी २४ नोव्हेंबरपर्यंत सरकारला डेडलाईन दिली आहे. राजकीय स्वार्थापोटी चळवळ चालविण्याचे काम शेट्टी यांनी सुरू केल्याची जाणीव शेतकऱ्यांना झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. ३५०० वरून मागे हटणार नाहीउसाचा उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांना किमान प्रतिटन ३५०० रुपये दर मिळाला पाहिजे. यासाठी १२ नोव्हेंबरला सातारा येथे ऊस परिषद होत असून ३५०० रुपये घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.