शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम लांबल्यास ऊस उत्पादकांना भुर्दंड

By admin | Updated: October 13, 2016 02:09 IST

पीककर्ज व्याज वाढणार : महिन्याला दहा कोटींचा फटका बसणार; रब्बीतील पिकावरही परिणाम होणार

प्रकाश पाटील --कोपार्डे --यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र दुष्काळसदृश परिस्थितीने घटल्याने ऊस उत्पादन कमी होणार आहे. हा मुद्दा पकडत मंत्री समितीच्या बैठकीत तब्बल एक महिना गाळप हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मात्र, हाच निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे. शेतकऱ्यांवर प्रत्येक महिन्याला पीक कर्जावर १० कोटींचे व्याज बसणार आहे. याचा रब्बी हंगामावरही परिणाम होणार असल्याचे या उद्योगातील तज्ज्ञ व ऊस उत्पादक शेकऱ्यांकडून मत व्यक्त करण्यात येत आहे.ऊस उत्पादकांना प्रतिएकर पीककर्ज ३५ हजार रुपयांप्रमाणे दिले जाते. या कर्जाची वसुली उसाच्या तोडणीनंतर कारखाने देत असलेल्या ऊस बिलातून होते. या पीक कर्ज वसुलीची जूनअखेर परतफेडीची मुदत असते. मात्र, गाळप हंगाम एक महिना लांबल्यास तोड होणाऱ्या उसाचे बिल एक महिना उशिरा येणार आहे. यामुळे संपूर्ण हंगामात जरी उसाची एक-एक महिना उशिरा तोड झाल्यास पीककर्ज भरण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना हातात पैसा न आल्याने वेळेत करता येणार नाही. जोपर्यंत या पीककर्जाचा परतावा शेतकऱ्यांकडून होणार नाही, तोपर्यंत बॅँका व्याज आकारणी करणार आहेत. त्यामुळे १ नोव्हेंबरऐवजी १ डिसेंबरला हंगाम सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर महिन्याला १० कोटींचा केवळ व्याजातून फटका बसणार आहे.जिल्ह्यात हंगाम २०१५-१६ मध्ये जिल्हा बॅँक, खासगी व राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून २१६९ कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे. यावर सर्व बॅँका १२ टक्के व्याज आकारणी करतात. यातून पंजाबराव देशमुख व्याज परताव्यातून शेतकऱ्यांना सूट देऊन सरासरी ६ टक्के व्याजाची आकारणी केली जाते. जिल्ह्यातील सर्व बॅँकांनी पीककर्जाच्या माध्यमातून वाटलेल्या रकमेवर ६ टक्केप्रमाणे जरी व्याज पकडले, तरी २१६९ कोटी पीककर्जाचे महिन्याचे व्याज १३ कोटी रुपये होणार आहे.जर कारखाने १ नोव्हेंबरऐवजी १ डिसेंबरला सुरू झाले, तर उसाची तोडणीही महिन्याच्या अंतराने लांबणार आहे. याचा तोटा शेतकऱ्यांना होणार असून खते, मशागत यामध्ये झालेल्या उत्पादन वाढीने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना उसाचे क्षेत्र सांभाळताना कसरत करावी लागणार आहे.एकरी उतारा घटणारआडसाली व पूर्वहंगामी उसाचे आजचे वय पाहिल्यास १५ महिन्यांचे आहे. हंगाम एक महिना पुढे गेल्यास हा ऊस तुटण्यासाठी किमान १७ ते १८ महिने पूर्ण होणार आहेत. यामुळे उसाच्या एकरी उत्पादनात मोठी घट होणार असून, याचा परिणाम साखर कारखान्यांच्या गाळप उद्दिष्टावरही होणार आहे.रब्बी हंगामावर परिणाम होणार उसाचे क्षेत्र तुटण्यास यावर्षी १ डिसेंबरला सुरुवात झाल्यास मोठी घट होणार आहे. सर्वसाधारण रब्बी हंगामाला डिसेंबरमध्ये सुरुवात होते. उसाचे क्षेत्र तुटल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी भुईमूग, गहू, सूर्यफूल, सोयाबीन यासारखी पिके रब्बी हंगामात घेतात. मात्र, एक महिना हंगाम उशिरा सुरू झाल्यास उसाखालील क्षेत्र न तुटल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेताना अडचणी येणार असून, यामध्ये मोठी घट होण्याचा अंदाज कृषितज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.पाण्याचा अतिरिक्त वापर अटळ मागीलवर्षी पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना ऊस पीक सांभाळताना कसरत करावी लागली. परिणामी, हंगाम एक महिना लांबल्यास ऊस पीक सांभाळण्यासाठी पाण्याचा अतिरिक्त वापर होणार असून, पाणी बचतीला ठेंगा बसणार आहे.हंगाम लांबल्यास शेतकरी उसाची विल्हेवाट लावण्यासाठी इतरत्र प्रयत्न करणार. यामुळे कारखान्यांना गाळप उद्दिष्ट गाठण्यास अडचणी येईल. त्याशिवाय पीककर्जाच्या व्याजाचा बोजा पडण्याबरोबर रब्बी हंगामही अडचणीत येणार आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर ही हंगाम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने १ नोव्हेंबरला सुरू करण्याची परिस्थिती आहे.- चंद्रदीप नरके, अध्यक्ष कुंभी-कासारी साखर कारखानामागीलवर्षी पाण्याच्या कमतरतेने शेतकरी हैराण झाला होता. त्यातच खते, मशागत यांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने व एफआरपीत एक रुपयाही वाढ झाली नसल्याने शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. पुन्हा हंगाम लांबल्यास याचा दूध व्यवसायावरही अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. रब्बी पिके घेताना उसाचे क्षेत्र तुटले तरच शक्य आहे. असे अनेक परिणाम होणार असून, हंगाम १ नोव्हेंबरला सुरू होणेच योग्य आहे.- अविनाश शिपुगडे, शेतकरी, शिंगणापूर, ता. करवीर.