शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

सदाभाऊ मोठे झाले तर मला का वाईट वाटावे, ते पक्ष सोडणार नाहीत : शेट्टी

By admin | Updated: January 5, 2017 23:50 IST

सदाभाऊ मोठे झाले तर मला का वाईट वाटावे, ते पक्ष सोडणार नाहीत : शेट्टी

कोल्हापूर : राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे चळवळीच्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रवाहातून बाजूला जाऊन ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी सुतराम शक्यता नाही. त्यांना राज्य मंत्रिमंडळात महत्त्व दिले गेले तर त्याचे मला वाईट वाटण्याचे कारणच नाही कारण संघटनेतून त्यांना मंत्री करा असे मीच सरकारला सुचविले होते असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली असून, सदाभाऊ भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या दोन-तीन दिवस प्रसिध्दी माध्यमांतून चर्चेत आहेत. त्या अनुषंगाने ते बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, ‘आम्ही दोघेही गेली पंचवीस वर्षे एकत्र चळवळीत काम करीत आहे. सदाभाऊंना मंत्री करावे असे संघटनेतून एकमेव नांव आम्ही सुचविले होते. त्यावेळीही कोणताच वाद नव्हता. मंत्री झाल्यावर सरकारच्या कामाबद्दल जसे चळवळीत आक्रमकपणे बोलता येते तसे बोलता येत नाही त्यामुळे त्यांची भाषा थोडी नरम झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. मंत्रिमंडळात त्यांचे महत्त्व वाढले तर त्याचे मला वाईट वाटायचे कारण नाही. कारण माझा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. मला चळवळीचा आधार घेऊन सत्तेत जायचे असते तर यापूर्वीच ते करता आले असते. शेतकरी चळवळीचे उत्तरदायित्व माझ्यावर आहे आणि सरकार चुकत असेल तर त्याविरोधात आक्रमकपणे बोलून सरकारला जाग्यावर आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हीच भूमिका मी सध्या पार पाडत आहे. सरकारवर दबाव टाकण्याचे तेवढे एकच अस्त्र आमच्याकडे आहे. कारण आमचा एकही आमदार नाही.’ (प्रतिनिधी)