शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आईने मोपेडवरचा प्रवास टाळला असता तर...!

By admin | Updated: June 15, 2016 00:37 IST

देवकर पाणंद हळहळला : ‘मम्मी कुठायं?’ मुलांच्या प्रश्नांनी कुटुंबीय गहिवरले

कोल्हापूर : त्यांची स्वत:ची आईही त्यांना जीव तोडून सांगत होती, ‘बाई, इतक्या लांबचा प्रवास आहे. मोपेडवरून जाऊ नकोस...’ पती अरुण हे तर माहेरी जातानाच गाडी घेऊन जायला विरोध करत होते. तरीही त्यांनी का कुणास ठाऊक, मोपेडवरून कऱ्हाडहून येणे पसंत केले. ही छोटीशीच चूक; परंतु ती एका कुटुंबावर दु:खाचा आघात करून गेली. मंगळवारी दिवसभर प्रत्येकाच्या तोंडात हेच होते. त्या मोपेड घेऊन गेल्या नसत्या तर?...राष्ट्रीय महामार्गावर शिये फाट्याजवळील दुर्गामाता धाब्याजवळ झालेल्या अपघातात सुवर्णा कोपार्डेकर यांचा जागीच मृत्यू झाला. भूमी व देवराज ही त्यांची मुले गंभीर जखमी झाली. भूमी देशमुख हायस्कूलमध्ये सहावीत शिकते; तर देवराज हा सिद्धेश्वर विद्यालयात दुसरीत शिकतो. त्यांची आज, बुधवारपासून शाळा सुरू होते म्हणून आई सुवर्णा त्यांना घेऊन येत असताना नियतीने मुलांची व आईची ताटातूट केली. मंगळवारी दिवसभर दोन्ही मुले प्रत्येकाला ‘आमची मम्मी कुठे आहे?’ म्हणून विचारत होती. त्यांची समजूत काढताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू अनावर होत होते. सुवर्णा कोपार्डेकर यांच्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. तुमच्या आईला जास्त दुखापत झाल्यामुळे त्यांना दुसऱ्या दवाखान्यात ठेवले असल्याचे मुलांना दिवसभर सांगण्यात येत होते.कोपार्डेकर कुटुंबीय देवकर पाणंदमध्ये राहणारे. अरुण कोपार्डेकर पूर्वी केबलचा व्यवसाय करीत होते. अलीकडे ते वाहनचालक म्हणून काम करीत आहेत. सुवर्णा या शिवणकाम करीत होत्या. सामान्य परंतु सुखी-समाधानी कुटुंब. आठ दिवसांपूर्वी सुवर्णा मोपेडवरूनच माहेरी कऱ्हाडला गेल्या होत्या. मुलांच्या शाळा सुरू होणार म्हणून त्या सकाळी सव्वाआठच्या सुमारास कोल्हापूरला निघाल्या. सकाळीही त्यांना त्यांच्या आई ‘गाडीवरून जाऊ नकोस बाई’ असा आग्रह करत होत्या. पतीही तेच सांगत होते; परंतु ‘सकाळी वाहतूक जास्त नसते; त्यामुळे येते शिस्तीत...’ असे सांगून त्या निघाल्या. किणी टोलनाक्यावर आल्यावर त्यांनी पतीला फोनही केला. ‘मला कशाने भीती वाटते हो...’ कोरेगावच्या ‘मानसिंग’ची माणुसकीकोरेगावचा मानसिंग पाटील हा तरुण अपघातग्रस्त मोपेडच्या मागेच होता. तो अशोक लेलँडमध्ये नोकरीस आहे. अपघात झाल्यावर त्याने तातडीने मोटारसायकलवरून उडी मारून रस्त्यावर पडलेल्या दोन्ही मुलांना उचलून रस्त्यातून बाजूला घेतले. पोलिसांना अपघाताची माहिती दिली. जखमी मुलांना घेऊन तो स्वत: सीपीआर रुग्णालयात आला. त्यांच्यावर उपचार होईपर्यंत तो थांबून होता. त्याने केलेल्या माणुसकीच्या मदतीमुळे किमान मुलांवर वेळेत उपचार होणे तरी शक्य झाले.