शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अंतराची अट रद्द झाल्यास पहिला कारखाना आपलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शासनाने दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिला साखर कारखाना उभारेल. राज्यात कारखान्यामध्ये होत असलेल्या काटामारीमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या गावात ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल त्या जागेवर वजनकाटा उभारणार आहे. शेतकºयांना कर्जमाफी मिळावी या ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळे शासनाने ३४ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शासनाने दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिला साखर कारखाना उभारेल. राज्यात कारखान्यामध्ये होत असलेल्या काटामारीमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या गावात ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल त्या जागेवर वजनकाटा उभारणार आहे. शेतकºयांना कर्जमाफी मिळावी या ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळे शासनाने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याचा लाभ शेतकºयांना झाला नाही. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने शेतकºयांचा सात-बारा कोरा करावा, या मागणीसाठी ३० आॅगस्टपासून देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.उदगाव येथे रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात खा. शेट्टी बोलत होते. ते पुढे म्हणाले, अच्छे दिनची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकºयांचा सात-बारा कोरा केला नाही, तर शेतकरी तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचतील. शेतकºयांच्या मालाला हमीभाव व कर्जमाफी देऊन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अन्यथा ३० आॅगस्टपासून जम्मू-काश्मीर येथून देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याचे सांगून सध्या होऊ घातलेल्या नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे यावे व स्वाभिमानीचा झेंडा फडकवावा, असे आवाहन खा. शेट्टी यांनी यावेळी केले.यावेळी महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, जि. प. सदस्य पद्माराणी पाटील, मन्सूर मुल्लाणी, माजी जि. प. सदस्य सावकार मादनाईक, मिलिंद साखरपे, रामचंद्र फुलारे, आदिनाथ हेमगिरे, राजगोंडा पाटील, भगवान काटे, बंडू पाटील, सुवर्णा अपराज, वैशाली पाटील, सुरेश कांबळे, कल्पना मस्के, शैलेश आडके, शांताराम पाटील, प्रकाश बंडगर, शिवाजी कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.सदाभाऊंचा निर्णय समितीच घेईलमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाईचा निर्णय समितीच घेईल. मंत्री खोत यांच्याशी वैयक्तिक मतभेद नाहीत, तर शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला लढायचे आहे. भाजप सत्तेत मी फक्त शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेलो आहे. त्यामुळे मला कोणत्याच मंत्रिमंडळावर जायचे नाही. शेतकरी बिल्ल्यावर प्रतिष्ठा ठेवून आपल्याबरोबर आहेत, त्यामुळे विचार करून निर्णय घ्या, असा चेंडू खा. शेट्टींनी सदाभाऊंच्याकडे टोलविला. त्यांचा निर्णय समितीच घेईल, असे खा. शेट्टी यांनी सूचित केले.सदाभाऊविना सभाखासदार शेट्टी यांनी स्वाभिमानी संघटनेची स्थापना केल्यापासून ‘स्वाभिमानी’च्या प्रत्येक मेळाव्याला खोत उपस्थित असायचे. त्यांचे रांगडे भाषण ऐकण्यासाठी शेतकरी आवर्जून येत असत. मात्र, रविवारी झालेली सभा सदाभाऊ खोत यांच्याविनाच पार पडली.