शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एक जीव वाचला तर ते माझ्या कामाचे यश

By admin | Updated: May 6, 2017 00:36 IST

संजय मोहिते : वाहतुकीला शिस्त लावण्यास प्राधान्य; ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात सर्वत्र वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. वाहन अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यास प्राध्यान्य राहील. वाढत्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करून एक जीव वाचला तर ते माझ्या कामाचे यश असेल, असे मत नूतन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मोहिते यांनी नुकतीच पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोहिते यांनी ‘लोकमत’ परिवाराशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात सर्वत्र वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. कोल्हापूरच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावून येथील रस्ते सुरक्षित बनविण्यासाठी आपला प्रयत्न राहील. वाहतूक समस्येसंबंधी स्थानिक लोकांशी चर्चा करून उपाययोजना राबविल्या जातील. वाहतुकीच्या प्रश्नावर काम करीत असताना एक जीव वाचला तर ते माझ्या कामाचे यश असेल. नागरिकांशी संवाद साधून काम केले जाईल. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. माझे बालपण कोल्हापुरात गेल्याने येथील राजकीय, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीची माहिती आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा आपला प्रयत्न राहील. त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ उपस्थित होते. वाहतूक पोलिस खाकीचा कणावाहतूक पोलिस हा खाकीचा कणा आहे. चार भिंतींच्या आत कोण कसा तपास करतो हे दिसून येत नाही; परंतु रस्त्यावर नागरिकांना अडवून वाहतूक शाखेचा पोलिस पैसे घेत असेल तर थेट पोलिस अधीक्षकांची बदनामी आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांचा कारभार पारदर्शक बनविण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असेही मोहिते यांनी सांगितले. बंद सिग्नल सुरू करणारशहरात चोवीस वाहतूक सिग्नल आहेत. त्यापैकी चार नादुरुस्त आहेत. गेल्या सात-आठ वर्षांपासून बंद असलेला गंगावेस येथील सिग्नल सुरू केला आहे. या चौकातील अतिक्रमण हटवून सुस्थितीत सिग्नल सुरू केल्याने या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी दूर झाली आहे. राजारामपुरी माऊली पुतळा चौकात सिग्नल सुरू करण्यात येणार आहे. शहरातील सर्व सिग्नल सुरू करून एकेरी मार्ग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.