शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

दखल न घेतल्यास सरकार कोसळेल

By admin | Updated: September 25, 2016 01:28 IST

मराठा मोर्चांबाबत राणेंचा इशारा : ‘हर हर महादेव‘ म्हणून चाल करण्याची मराठ्यांवर वेळ

कोल्हापूर : राज्यात दहा-पंधरा लाखांचे मराठ्यांचे मोर्चे निघत असतानाही जर दखल घेतली नाही, तर राज्य सरकार कोसळेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला. सरकार बदलण्याची ताकद या मोर्चांमध्ये आहे असे सांगून, आता ‘हर हर महादेव’ म्हणून चाल करण्याची वेळ मराठ्यांवर आली आहे, असेही ते म्हणाले. येथील राजाराम कॉलेजचे प्राचार्य कै. डॉ. बाळकृष्ण यांच्या ‘शिवाजी द ग्रेट’ या इंद्रजित सावंत यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी राणे यांच्या हस्ते येथील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये झाले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आरक्षणाबाबत सरकारनेच आता ठोस भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राणे म्हणाले, घटनेच्या १५/४ आणि १६/४ या कलमांनुसार सामाजिक आणि आर्थिक मागास समाजाला आरक्षण देता येते. याचा आधार घेऊन आमच्या सरकारने अन्य कोणाचेही आरक्षण काढून न घेता तमिळनाडूच्या धर्तीवर ५२ टक्क्यांवर आरक्षण मागितले होते. मात्र, न्यायालयात यामध्ये त्रुटी निघाल्या. आम्ही १८ लाख जणांचे सर्वेक्षण करून जो अहवाल मांडला, त्यातील ठळक मुद्दे मांडून हे आरक्षण न्यायालयात टिकविता (पान १ वरून) येईल. ते या सरकारने करण्याची गरज आहे. आतापर्यंत मनोहर जोशी आणि सध्याचे सोडले तर जे मुख्यमंत्री झाले त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली. मी मराठा जातीत जन्माला आलो, त्यामुळेच आताचे हे मोर्चे पाहून मला समाधान वाटते, आनंद वाटतो. (प्रतिनिधी)