शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

...तर आघाडीत थंड

By admin | Updated: September 16, 2014 00:08 IST

महायुतीच्या कार्यालयात लगबग : राजकीय पक्ष कार्यालयातील चित्र

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी भाजप-शिवसेनेसह भाकपच्या कार्यालयात लगबग, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यालयात सामसूम असे चित्र पाहायला मिळाले.शिवसेनेच्या शनिवार पेठ येथील शहर कार्यालयात शिवसैनिकांची धावपळ सुरू होती. निवडणूक साहित्यांची जमवाजमव व वितरण याबाबतचे नियोजन सुरू होते. आमदार राजेश क्षीरसागर बैठकीसाठी मुंबईला गेले होते. त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे कार्यकर्ते या नियोजनात मग्न होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारी (दि. १८) दौऱ्यावर येणार असल्याने भाजपच्या बिंदू चौक येथील कार्यालयात आज त्यांच्या नियोजनाबाबतची बैठक सुरू होती. आमदार चंद्रकांतदादा पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.शिवाजी रोडवरील भाकपच्या कार्यालयात कोल्हापूर उत्तरचे उमेदवार रघुनाथ कांबळे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. यावेळी ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्टेशन रोडवरील कॉँग्रेस कार्यालयात सामसूम होती. कार्यालय प्रमुख वगळता अन्य कोणीही नेते व पदाधिकारी इकडे दिवसभर फिरकले नव्हते. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात तर आज कुलूपच होते. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हॉटेल पंचशील येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या स्वागतासाठी तिकडे गेल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)