शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विचार, भूमिकेवर निवडणुका व्हायच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:04 IST

माझ्या विद्यार्थिदशेपासून १९५२ नंतर मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. सदाशिव मंडलिक, व्ही. बी. पोवार, अशोक पोवार हे माझ्यासोबतचे कार्यकर्ते. आम्ही ...

माझ्या विद्यार्थिदशेपासून १९५२ नंतर मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. सदाशिव मंडलिक, व्ही. बी. पोवार, अशोक पोवार हे माझ्यासोबतचे कार्यकर्ते. आम्ही सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचे काम करीत होतो. नंतर कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.मात्र, त्यावेळी पक्षाची भूमिका आणि उमेदवाराचे वैयक्तिक चारित्र्य, विचार यांचा विचार करून उमेदवारी दिली जात असे आणि मतदानही होत असे. आता परिस्थिती बदलली आहे. गुणवान माणसापेक्षा धनवान माणसाला उमेदवारीची संधी अधिक असल्याचे चित्र पाहावयास मिळते.कॉँग्रेसमध्ये एकदा का उमेदवारी पक्षाने निश्चित केली की, मग जिल्हा पातळीवर मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक व्हायची. त्यावेळी नेते पक्षाशी आणि कार्यकर्ते नेत्याशी एकनिष्ठ होते. त्यामुळे या बैठकीत एकदा प्रचाराचे नियोजन ठरले की, तालुका पातळीवरील नेते त्याची जबाबदारी घ्यायचे. उमेदवार आणि आम्ही प्रमुख कार्यकर्ते प्रचाराला जायचो. मोठ्या गावांतून प्रचार फेऱ्या निघायच्या. सभा व्हायच्या. कार्यकर्त्यांच्याच घरी जेवणाची सोय केली जायची; कारण हॉटेल्स, खानावळी मोजक्या असायच्या आणि मुळात रोख पैसे जवळ फार नसायचेच. अनेक वेळा आम्ही घरच्या भाकरी बांधून प्रचाराला गेलो आहोत. बैलगाडीतून प्रचाराला गेलो आहोत. मुळात कार्यकर्त्यांना जनतेमध्ये सन्मान होता. बºयापैकी प्रचार जीपमधून व्हायचा. अ‍ॅम्बॅसडर गाडीमध्ये बसायला मिळणे भाग्याचे वाटत असे.शंकरराव माने, व्ही. टी. पाटील, भाऊसाहेब महागावकर, शंकरराव डिगे यांच्यापासून ते उदयसिंगराव गायकवाड यांच्यापर्यंतच्या अनेक निवडणुकींत मी सक्रिय होतो. मात्र, २००० नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांचे स्वरूपच पालटून गेले आहे.वैयक्तिक उमेदवार कसा आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे, यापेक्षा राष्ट्रीय नेतृत्वाच्या लाटेवर विजयी होण्याचे दिवस आता आले आहेत. ‘ढाबा संस्कृती’ आता बळावली आहे. त्या कालावधीत आम्ही यशवंतराव चव्हाण, केशवराव जेधे, शंकरराव मोरे, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांची प्रभावी भाषणे ऐकण्याची संधी आम्हांला मिळाली. या नेत्यांच्या भाषणांमध्ये अजिबात वैयक्तिक टीका नसायची. पक्षाच्या ध्येयधोरणावरच टीकाटिप्पणी केली जायची. त्यामुळे एका विधायक वातावरणामध्ये निवडणुका व्हायच्या. ही परिस्थिती आता राहिलेली नाही, याचे वैषम्य वाटते.दादासाहेब जगताप