शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आयडीबीआय’ला चार कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:50 IST

कोल्हापूर : शासनाची पीक व पाईपलाईन कर्जयोजना मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांचे खोटे सातबारा व ‘आठ अ’ उतारा सादर करून क्रशर ...

कोल्हापूर : शासनाची पीक व पाईपलाईन कर्जयोजना मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांचे खोटे सातबारा व ‘आठ अ’ उतारा सादर करून क्रशर चौकातील आयडीबीआय बँकेच्या शाखेला चार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. अपहाराची रक्कम बारा कोटींच्या घरात पोहोचली आहे.या रॅकेटचा म्होरक्या संतोष बळवंत पाटील (वय ३०, रा. आरळे) याच्या चौकशीमध्ये ही माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याची बँक खाती गोठवली आहेत. त्याच्या स्थावर मालमत्तेसह नातेवाईकांची चौकशी पोलीस करीत आहेत. पीक कर्जाच्या नावाखाली आयडीबीआयसह अन्य बँकांनाही गंडा घातल्याची भीती व्यक्त केली जात आहे.वरणगे (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेला सुमारे आठ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी फरार म्होरक्या संतोष पाटील याला अटक केली आहे. सध्या पोलीस कोठडीमध्ये त्याच्याकडून पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्यामध्ये त्याने तत्कालीन व्यवस्थापक जयंत गंधे यांना हाताशी धरून क्रशर चौकातील आयडीबीआय बँकेत सुमारे चार कोटींचा अपहार केल्याचे तपासात पुढे आले आहे. तपासाची व्याप्ती वाढली असून, पोलीसही चक्रावून गेले आहेत.पाटील याने कर्जदारांच्याकडून घेतलेल्या पैशातून स्थावर मालमत्तेसह आणखी काही खरेदी केले आहे काय, याची पोलीस चौकशी करीत आहेत. त्याच्या जवळच्या नतेवाईकांचीही गोपनीय चौकशी सुरू आहे. त्याची सर्व बँकखाती गोठवली आहेत. त्याच्यासह आर. डी. पाटील या दोघांच्या सर्व मालमत्तेवर न्यायालयाच्या आदेशानुसार टाच आणण्यासाठी विधिज्ञांची मदत घेत आहेत.गंधेच्या माहितीची पडताळणीबनावट कर्ज प्रकरणे ६00 च्या वरती असल्याने पोलिसांची डोकेदुखी झाली आहे. कर्जाचा लाभ घेतलेल्या ६00 शेतकऱ्यांना पोलिसांनी नोटिसा पाठविल्या आहेत. प्रत्येक शेतकºयाचा वैयक्तिक जबाब घेतला जात आहे. त्यामध्ये संतोष पाटील याने आमचेकडून कमिशन घेतल्याचे प्रत्येकजण सांगत आहे. बँक व्यवस्थापक, तलाठी, कर्जदार, एजंट यांच्याकडे चौकशी सुरू आहे. तत्कालीन व्यवस्थापक गंधे हा पोलिसांची दिशाभूल करीत आहे; परंतु त्याने सांगितलेल्या माहितीची पोलीस पडताळणी करीत आहेत. पाटील यानेच गंधे यांचे नाव घेतल्याने ते आरोपींच्या पिंजºयात अडकले आहेत. विधिज्ञांच्या सल्ल्यानंतर त्यांना अटक करण्याची दाट शक्यता आहे.