शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

चिन्ह नोंदणीकृत पक्षांसाठीच

By admin | Updated: January 24, 2017 00:33 IST

दादा, गणित जमलं....!

कोल्हापूर : ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण सदस्यसंख्येच्या पाच टक्के जागा या एकापेक्षा कमी येत असतील, तर किमान एका जागेवर निवडून आलेल्या राजकीय पक्षास जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून मुक्त चिन्हांपैकी एक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांना आरक्षित करण्यासाठी अर्ज करता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सोमवारी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेले मुक्त चिन्ह त्या नोंदणीकृत पक्षासाठी त्या निवडणुकीसाठी तात्पुरते आरक्षित मुक्त चिन्ह असल्याचे घोषित करण्याची तरतूद केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्ष त्यांच्यासाठी राखीव केलेली चिन्हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी प्रदान करण्याची तरतूद आहे. मात्र, इतर सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांना (ज्यांना निवडणूक आयोगाची मान्यताप्राप्त नाही) प्रत्येक जागेसाठी मुक्त चिन्ह (आवश्यक असेल तर लॉटरी पद्धतीने) प्रदान करण्याची तरतूद आहे. त्यामुळे एका राजकीय पक्षाला एकाच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उभे केलेल्या वेगवेगळ्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांचे वाटप होते. त्यामुळे त्यांना प्रचार करण्यास अडचणी येतात. राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, दिनांक ३१ मार्च २००९ (त्यामधील वेळोवेळी सुधारणासह) मध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उपविभाग शनिवार दि. २१ जानेवारी २०१७ नुसार राजकीय पक्षांना चिन्ह, आरक्षण निवड व वाटप करणे आणि त्यासंबंधीच्या बाबींविषयी नवीन तरतुदी केल्या आहेत. ज्या पक्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तात्पुरते आरक्षित मुक्त चिन्ह घोषित केले आहे, अशा पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवारास पक्षाकरिता आरक्षित केलेल्या चिन्हाची निवड त्या निवडणुकीसाठी करता येईल.