शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत पाण्यासाठी आंदोलन

By admin | Updated: April 21, 2016 00:57 IST

टाळे ठोकले : जलअभियंता धारेवर, नागरिकांनी कर्मचाऱ्यांना कोंडले

इचलकरंजी : चार महिन्यांपासून कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असून, पालिका प्रशासनाला कळवूनही त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. या कारणावरून मुरदुंडे मळा व कलानगर परिसरातील नागरिकांनी नगरसेवक महादेव गौड यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाला बुधवारी टाळे ठोकले. दरम्यान, नगराध्यक्षांच्या दालनातील चर्चेवेळी संतप्त नागरिकांनी जलअभियंता ए. एन. जकीनकर यांना धारेवर धरले. दोन दिवसांत भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले.प्रभाग क्रमांक १२ मधील मुरदुंडे मळा, गल्ली नं. १ परिसरात चार महिन्यांपासून पाणीच येत नाही. तर कलानगर भागात दोन महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या; पण परिस्थिती तशीच आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ठिकठिकाणी खुदाई केली आहे; पण चूक कोठे , हेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना समजत नाही. संतप्त नागरिकांनी पालिकेवर नगरसेवक महादैव गौड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना कोंडून घालून दरवाजाला टाळे ठोकले. सर्वांनी पाणीपुरवठा विभागाच्या दारात ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सुमारे १५ मिनिटांच्या आंदोलनानंतर नगराध्यक्षांच्या दालनात सर्वांना बोलविले. तेथे नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष महावीर जैन, अजितमामा जाधव, पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, जलअभियंता ए. एन. जकीनकर उपस्थित होते. महादेव गौड यांनी परिस्थितीची माहिती देत नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दूरध्वनी बंद तरी असतात किंवा दोन दिवसांत काम करतो, अशी उत्तरे दिल्याचे सांगितले. यावेळी संतप्त नागरिकांनी जकीनकर यांना चांगलेच धारेवर धरले, यामुळे दालनात गोंधळ निर्माण झाला . अखेर चर्चेअंती दोन दिवसांत भागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात सुरेश भुते, हणमंत वाळवेकर, शशिकांत राक्षे, जितेंद्र जानवेकर, वसंत तोडकर, विद्याधर पवार, पंडित वाळवेकर, सुभाष बंडगर, दीपक बंडगर, राजू पवार, शारदा डंबाळ, मंगल भंडारे, शोभा तेजम, विद्या पवार, वैशाली मांगलेकर, ज्योती डांगरे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. काहीच पदरी पडत नसल्याने नागरिक संतप्तपाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने एका भागात मुबलक पाणी, तर एका भागात पाणीच येत नाही. शिवाय भागातील कूपनलिका बंद पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. कामासंदर्भात चौकशी करता आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडत नसल्याने नागरिक संतप्त झाले.