शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत संजीवनी हॉस्पिटलची तोडफोड

By admin | Updated: July 12, 2017 00:09 IST

इचलकरंजीत संजीवनी हॉस्पिटलची तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून संतप्त नातेवाइकांनी मंगळवारी हॉस्पिटलची तोडफोड केली. तसेच डॉ. सुनील बडवे यांना बेदम मारहाण केली. अर्जुन निवृत्ती जाधव (वय ४७, रा. भारतमाता हौसिंग सोसायटी) असे दगावलेल्या रुग्णाचे नाव आहे. या घटनेमुळे हॉस्पिटल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, नातेवाइकांच्या तक्रारीनंतर दगावलेल्या व्यक्तीचा मृतदेह कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अर्जुन जाधव हे दहा दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी (३० जून) उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करून विविध चाचण्या घेण्यात आल्या. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असून, फुप्फुसामध्ये निमोनिया पसरला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.दरम्यान, मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाइकांनी त्यावेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना बोलावले. रुग्णाला लावलेल्या मशीनची वायर निघाली असल्याचे सांगितले. मात्र, डॉक्टर लवकर आले नाहीत, असा आरोप नातेवाइकांनी केला. त्यानंतर डॉक्टरांनी येऊन वायर पुन्हा जोडली. त्यानंतर काही वेळाने रुग्ण दगावला असल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले. त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्ण दगावल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अन्य नातेवाइकांना ही माहिती समजताच तेही रुग्णालयात आले. त्यांनी डॉक्टर बडवे यांना जाब विचारत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच दवाखान्याच्या मुख्य दरवाजाची तोडफोड केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही व टेलिफोनचीही मोडतोड केली. ही माहिती समजताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश पवार यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. नातेवाइकांचा आरोप व परिस्थिती पाहून पोलिसांनी आणखी कुमक मागवून घेतली. पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे शहाजी निकम, गावभागचे पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मध्यस्थी करीत पोलिसांनी मृत व्यक्तीचे कोल्हापुरात शासकीय रुग्णालयातील पथकामार्फत शवविच्छेदन करून तेथील अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच रुग्णालयातील संबंधित रुग्णावरील उपचाराची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली, तर जखमी झालेल्या डॉ. बडवे यांच्यावर संजीवनी हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू आहेत. उपचार पद्धतीबाबत नाराजीया हॉस्पिटलमध्ये रुग्णावर अनावश्यक उपचार करणे. तसेच कर्मचाऱ्यांकडून बेजबाबदारपणाने दिली जाणारी वागणूक, जास्त बिल करणे, असे अनेक प्रकार वारंवार घडतात. त्यामुळेच मंगळवारी असा प्रकार घडला असावा, अशी चर्चा हॉस्पिटल परिसरात जमलेल्या नागरिकांत सुरू होती.गैरसमजुतीतून प्रकार : संजीवनी हॉस्पिटलसंजीवनी हॉस्पिटलच्यावतीने डॉक्टर इम्तियाज पठाण व पद्मजा बडबडे यांनी सांगितले की, हा प्रकार गैरसमजुतीतून झाला आहे. जाधव यांच्या हाताला लावलेली पिन निघाली असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ती पिन फक्त आॅक्सिजनची टक्केवारी दाखविणारी होती. त्याचा उपचाराच्या हलगर्जीपणामध्ये संबंध येत नाही. टेक्निकल माहिती नसल्यामुळे नातेवाइकांकडून असे आरोप होत आहेत. रुग्णाच्या फुप्फुसात व्हायरल निमोनिया पसरला होता. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती. याबाबत रुग्णाच्या नातेवाइकांना माहितीही देण्यात आली होती. त्यामुळे हा प्रकार म्हणजे निव्वळ गैरसमजुतीतून घडला असून, वैद्यकीय अहवाल व रुग्णावर केलेल्या उपचाराच्या कागदपत्रांच्या तपासणीनंतर सर्व प्रकार स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले. यावेळी डॉ. गोविंद ढवळे, डॉ. मुकुंद बडवे, डॉ. एस. पी. मर्दा, आदी डॉक्टर उपस्थित होते. डॉक्टर व अन्य कर्मचारी मोबाईलमध्ये व्यस्तरुग्णाची परिस्थिती व मशीनची वायर निघल्याचे सांगूनही त्यावेळी हजर असणारे डॉक्टर व कर्मचारी मोबाईलमध्ये व्यस्त होते. त्यामुळे त्यांनी वेळेत हालचाल केली नाही. त्यामुळेच रुग्ण दगावला, असाही आरोप नातेवाइकांतून सुरू होता. त्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले.सोशलवरून संदेशया घटनेचे सोशल मीडियावरून संदेश फिरू लागले. त्यामध्ये चार दिवसांपासून मृत असलेल्या व्यक्तीवर संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. हे उघडकीस येताच नातेवाइकांकडून हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. त्यामुळे दिवसभर चर्चेला ऊत आला होता.