शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

इचलकरंजीत हाळवणकर यांच्या ई-माहिती, तक्रार केंद्राचे उद्घाटन

By admin | Updated: December 26, 2014 00:46 IST

राज्यातील पहिला उपक्रम : तक्रारी मिस कॉलद्वारे करण्याचे आवाहन

इचलकरंजी : येथील विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या तक्रारी व सूचना थेट आमदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी ई-माहिती व तक्रार केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यात पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात आला असून, त्याचे उद्घाटन आमदार हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास रानडे होते. या योजनेचा मतदारसंघातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हाळवणकर यांनी केले.ई-माहिती व तक्रार केंद्रात आपली तक्रार किंवा माहिती नोंदविण्यासाठी नागरिकांनी ०४०७१०१५१५५ या क्रमांकावर मिस कॉल करावयाचा आहे. त्यानंतर या प्रणालीद्वारे आपणास एसएमएस प्राप्त होईल. त्यानंतर त्या एसएमएसमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर आपल्या शहर-गावाचे नाव, आपले नाव, पत्ता व थोडक्यात तक्रार पाठवायची आहे. त्यानंतर आमदार कार्यालयातून संबंधित तक्रारदारास दूरध्वनीद्वारे विचारणा केली जाईल आणि त्यानुसार तक्रार निवारण करून त्यानंतर पुन्हा एसएमएसद्वारे तक्रारदारास त्यांच्या तक्रारीसंदर्भातील पूर्ततेची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या तक्रारी आॅनलाईन सोडवून घ्याव्यात, असे आवाहन हाळवणकर यांनी केले आहे.कार्यकर्त्यांनी या योजनेबाबत नागरिकांना माहिती देऊन त्यांच्या तक्रारी, अडचणी व सूचना समजावून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करावा. यासाठी आवश्यक ती सर्व मदत आमदार कार्यालयामार्फत केली जाणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत, आदी निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या संपर्कात राहून लोकाभिमुख कामे करावीत. तसेच आठवड्यातून एक दिवस एक ते दोन तास स्वच्छता अभियानासाठी देऊन आपल्या परिसरात स्वच्छता अभियान राबवावे, असे आवाहनही हाळवणकर यांनी यावेळी केले. कार्यक्रमास हिंदुराव शेळके, धोंडिराम जावळे, गोपाल जासू, प्रवीण खामकर, शहाजी भोसले, मदन झोरे, आदींसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, बुथ प्रतिनिधी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)