शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:32 IST

इचलकरंजी : वस्तू व सेवाकरातील (जीएसटी) जाचक आणि फूड सेफ्टी अ‍ॅक्टमधील अडचणीच्या तरतुदीविरोधात शुक्रवारी शहरातील छोटे व्यावसायिक व व्यापाऱ्यांकडून ...

इचलकरंजी : वस्तू व सेवाकरातील (जीएसटी) जाचक आणि फूड सेफ्टी अ‍ॅक्टमधील अडचणीच्या तरतुदीविरोधात शुक्रवारी शहरातील छोटे व्यावसायिक व व्यापाऱ्यांकडून बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, इचलकरंजी शहर किरकोळ किराणा भुसारी व्यापारी असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन दिले.

भारत व्यापार बंद व देशव्यापी चक्का जामची घोषणा करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी बंद पाळला. जीएसटी करप्रणाली अतिशय किचकट व गुंतागुंतीची असून, त्यामध्ये सुधारणा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिष्टमंडळात महावीर शिरगुप्पे, संतोष पाटील, संजय वठारे, जितेश हुक्केरी, सुभाष तनंगे, मोहन भोसले, उत्तम डोणे, किशोर जगदेव, चंद्रकांत कसलकर, संकेत बरगाले आदींचा समावेश होता.

फोटो ओळी

२६०२२०२१-आयसीएच-०२

जीएसटी करप्रणाली अतिशय किचकट व गुंतागुंतीची असून, त्यामध्ये सुधारणा करावी, अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी शहर किरकोळ किराणा भुसारी व्यापारी असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.